वेरळ घाटात कंटेनर-एसटीचा अपघात; महामार्ग तासभर ठप्प

Sep 16, 2024 - 10:39
 0
वेरळ घाटात कंटेनर-एसटीचा अपघात; महामार्ग तासभर ठप्प

लांजा : मुंबई - गोवा महामार्गावर वेरळ घाटात कंटेनर आणि एसटीचा अपघात झाल्याने मुंबई व गोवाच्या दिशेने जाणारी वाहतूक तासभर ठप्प पडली होती. हा अपघात रविवारी सायंकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास घडला.

महामार्ग मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू असले तरी वेरळ घाटामध्ये अजूनही इंग्रजी 'यू' आकारांचा अवघड वळणावर अवजड वाहने अडकून पडत आहेत. मुंबईहून गोवाच्या दिशेने जाणार मोठा कंटेनरने राजापूरहून रत्नागिरीच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसला मागील बाजूने धडक दिली. त्यामुळे एस टी च्या उजव्या बाजुचा पत्रा फाटल्याने 
बसचे मोठे नुकसान झाले. 

मात्र, एस टी बस आणि कंटेनर महामार्गाच्या मध्यभागी अडकून पडल्याने मुंबई व गोवा दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. महामार्गावर वाहनांच्या १ कि.मी पर्यंत रांगा लागल्या होत्या. महामार्गावरील तासभर वाहतूक विस्कळीत झाली होती. लांजा पोलीस निरीक्षक नीळकंठ बगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन सहकाऱ्यांच्या सहकार्याने एसटी व कंटेनर बाजूला करण्याचे प्रयत्न केले. तासाभराने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक एकेरी सुरू होती. मात्र मुंबईच्या दिशेने परतीला जाणारे चाकरमानी अडकून पडले होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:08 16-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow