बीट अंमलदार अजय मोहिते यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान

Aug 10, 2024 - 17:19
 0
बीट अंमलदार अजय मोहिते यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान

रत्नागिरी : जिल्हा पोलीस दलात सध्या वाहतूक शाखेत कार्यरत असणारे बीट अंमलदार अजय तुळशीराम मोहिते यांना कोकणचा सन्मान सामाजिक संस्थेच्या वतीने समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. 

आजवर मोहिते यांनी सामाजिक बांधिलकी जपत पोलीस दलातील एक आदर्श कर्मचारी असा नावलौकिक मिळवला आहे. याच कामाची दाखल घेत अजय तुळशीराम मोहिते यांना समाजभूषण पुरस्कार देण्यात आल्याची माहिती कोकण सन्मान सामाजिक संस्थेकडून देण्यात आली आहे. अजय मोहिते यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल नागरिकांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:48 10-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow