मुंबई विद्यापीठ जलतरण स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाला तीन पदके

Sep 17, 2024 - 10:33
 0
मुंबई विद्यापीठ जलतरण स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाला तीन पदके

रत्नागिरी : मुंबई विद्यापीठ पुरुष व महिला वैयक्तिक जलतरण स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या (स्वायत) विद्यार्थिनी १ सुवर्ण, ३ रौप्य आणि कांस्यपदक पटकावले.

महाविद्यालय आर्टम, कॉमर्स आणि सायन्स (डोंबिवली, ठाणे) यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई विद्यापीठ पुरुष महित्य जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थांनी यश मिळविले. त्यामध्ये तनया मितके हिने ५० मी. बँकाट्रोकमध्ये सुवर्णपदक, २०० मी. बँकाट्रोकमध्ये रौप्यपदक ४०० मीटर फ्री स्टाईलमध्ये रौप्यपदक २०० मी. बटरफ्लायमध्ये रौप्य, २०० मी. आयाएममध्ये कांस्यपदक पटकावले पुरुष संघातील करण मिलके याने २०० मीटर बटरफ्लायमध्ये कांस्यपदक, अथर्व देसाईने ५० मी. बटरफ्लापमध्ये सहावा क्रमांक मिळविला या यशस्वी विद्याध्याचे अभिनंदन. र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे, निमवाय समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर व सर्व सदस्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद माळकर, उपप्राचार्य, जिमखाना कमिटीचे उपाध्यक्ष डॉ. विवेक भिडे, क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे आदीनी अभिनंदन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:01 AM 17/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow