राजापूर : खोदलेल्या साईडपट्टीत एसटी रुतली

Sep 17, 2024 - 10:59
 0
राजापूर : खोदलेल्या साईडपट्टीत एसटी रुतली

राजापूर : : राजापूर तालुक्यातील पांगरे धरणावरून १३ गावांसाठी प्रादेशिक नळपाणी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या कामामध्ये पाईपलाईन टाकण्यासाठी रस्त्याच्या शेजारी खोदण्यात आले आहे. रस्त्याच्या शेजारी करण्यात आलेल्या खोदकामामुळे पाचल-राजापूर ही एस.टी. जांभलीतिठानजीक मातीत फसली. चालकांच्या प्रसंगावधानाने बस पलटी होताना वाचली.

पांगरे चिंचवाडी धरणावरून जलजीवन मिशनअंतर्गत या परिसरातील १३ गावांसाठी प्रादेशिक नळपाणी योजना राबविण्यात येत आहे. उन्हाळ्यात या योजनेचे पाईप लाईन टाकण्याचे काम करण्यात आले. मात्र, हे काम करताना राजापूर रेल्वेस्टेशन या मुख्य रस्त्यासहीत गावांमधील वाडीवस्तीमध्ये जाणाऱ्या रस्त्याच्या शेजारीच खोदकाम करून पाईप लाईन टाकण्यात आली. यावेळी याबाबत तकारी करूनही संबंधितांनी त्याची दखल घेतलेली नाही. रस्त्याच्या शेजारीच खोदकाम करण्यात आले असल्याने ती जागा माती सैलसर झाली असल्याने पावसामुळे खड्डेमय झाली आहे. त्यामुळे साईडपट्टीवरून वाहन घेऊन जाणे जिकिरीचे झाले आहे. काही ठिकाणी रस्ता अरुंद असल्याने समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देण्यासाठी गाडी साईडपट्टीवर न्यावी लागत आहे.

रविवारी दुपारच्या सत्रात पाचल राजापूर ही फेरी राजापूरकडे येत असताना जांभलीतिठानजीक समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देताना साईडपट्टीवर रुतली. राजापूर रेल्वेस्टेशन हा मार्ग महत्त्वाचा मार्ग बनला आहे. मात्र, या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी व रुंदीकरणासाठी लक्ष दिले जात नाही.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:27 AM 17/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow