दुचाकी उभी करताना विवाहितेच्या अंगावर घातली कार

Sep 17, 2024 - 17:12
 0
दुचाकी उभी करताना विवाहितेच्या अंगावर घातली कार

रत्नागिरी : राज्यात महिलांवरील अत्याचारांचा गुन्हा वाढ होत असतानाच आता हे लोन ग्रामीण भागापर्यंत पोहोचले आहे. देवरुख शहरानजीकच्या वाशी तर्फे देवरुख येथे रस्त्याच्या कडेला दुचाकीवर उभे असलेल्या विवाहितेला कारने धडक देण्यात आली. यामध्ये ही विवाहिता जखमी झाली असून देवरुख येथे उपचार करून त्यांना रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

विवाहितेने देवरुख पोलीस स्थानकात रितसर तक्रार दाखल केले आहे परंतु पोलिसांनी केवळ अदखलपत्र गुन्हा नोंदविला आहे. तर हल्ला करणार्‍या व्यक्तीविरोधात यापूर्वीही तक्रारी देऊनही पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नसल्याचा आरोप वैदेही सुधीर सावंत यांनी लेखी निवेदनाद्वारे केला आहे. त्यामुळे देवरूख पोलिसांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

ही घटना 11 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी पावणेपाच ते सव्वापाच वाजण्याच्या दरम्यान वाशी तर्फे देवरुख ग्रामपंचायतीकडे जाणार्‍या रस्त्यावर ही घटना घडली. तक्रारदार वैदेही सुधीर सावंत या स्वत:च्या गावी गणपतीच्या दर्शनासाठी गेल्या होत्या. त्यांच्या ओळखीच्या मुली दिसल्या म्हणून त्या रस्त्या उभ्या राहून बोलत होत्या. दोन्ही मुली निघून गेल्यानंतर घरासमोर त्या गाडी उभी करीत होत्या. त्यावेळी समोरुन आलेल्या कारने त्यांच्या गाडीला धडक दिली. ही गाडी तेजस उर्फ पिंट्या जागुष्टे हा चालवत होता. या धडकेमुळे आपण खाली पडून उजव्या साईडच्या खुब्याला व डाव्या पायाला मुकामार बसला आहे. या घटनेनंतर तेजस जागुष्टे याने आपल्याला शिवीगाळ करीत धमकी देत निघून गेल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी आपण दिलेल्या तक्रारीवरुन देवरुख पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

याच व्यक्ती विरोधात यापूर्वीही तक्रार दिलेली आहे. घटनेच्या दिवशी पोलीस स्थानकात रात्री साडेआठ वाजल्यापासून जवळपास रात्री पावणेदोन पर्यंत बसवून ठेवले व त्यानंतर अदखलपात्र गुन्हा दाखल केला. पोलीस यंत्रणेकडून जाणूनबुजून चालढकलपणा केला जात असल्याचा आरोप वैदेही सावंत यांनी केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:46 17-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow