खेड : ऑनलाईन फसवणुकीतील मुख्य सूत्रधाराचा सुगावा

Sep 19, 2024 - 12:36
 0
खेड : ऑनलाईन फसवणुकीतील मुख्य सूत्रधाराचा सुगावा

खेड : शहरातील एका तरुणाच्या ऑनलाईन २४ लाख ८५ हजार रुपयांच्या फसवणूक प्रकरणातील मुख्य सूत्रधाराचा येथील पोलिसांना सुगावा लागला आहे. संशयित सूत्रधार आर्थिक व्यवहारांची सर्व सूत्रे पार पाडण्याची भूमिका पार पाडत असल्याची माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे. संशयित भारतातीलच असून, त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी लवकरच पोलिस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखाली पथके रवाना होणार आहेत. शहरातील एका तरुणास जादा रकमेच्या परताव्याचे आमिष दाखवत तब्बल २४ लाख ८५ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी येथील पोलिसांनी आतापर्यंत चौघांना गजाआड केले आहे. यातील दोघे न्यायालयीन कोठडीत, तर अन्य दोघे पोलिस कोठडीत आहेत. सुरत येथे अटक केलेल्या जिम्मीभाई भगत (वय ४०), सोनू टेलर (२४) या दोघांची येथील पोलिसांनी कसून चौकशी केली असता मुख्य सत्रधाराची माहिती हाती लागली.

पोलिसांनी दोन्ही संशयितांचे ३० हजार रुपये किमतीचे मोबाईल हस्तगत करत त्यातून काही माहिती मिळविण्याचाही प्रयत्न सुरू आहे. मुख्य सूत्रधाराचा पोलिसांना सुगावा लागल्याने त्याला जेरबंद करण्यासाठी लवकरच पोलिसांची पथके ठिकठिकाणी रवाना होणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:04 PM 19/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow