कुवारबाव नजीक मैत्रिणीवरुन झालेल्या वादातून तरुणाला मारहाण

Sep 19, 2024 - 12:49
Sep 19, 2024 - 12:49
 0
कुवारबाव नजीक मैत्रिणीवरुन झालेल्या वादातून तरुणाला मारहाण

रत्नागिरी : शहरानजीकच्या कुवारबाव आरटीओ ब्रिज येथे मैत्रिणीवरुन झालेल्या वादातून तरुणाला मारहाण करण्यात आली. ही घटना रविवारी रात्री ९.३० च्या सुमारास घडली. प्रथमेश निलमेश कांबळी (२४, रा. रत्नागिरी) असे यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने दिलेल्या तक्रारीनुसार शहर पोलिसांनी संकेत चव्हाण व त्याच्यासोबत असलेले अन्य दोघे संशयित यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमेश कांबळी हा १५ सप्टेंबर रोजी त्याच्या मैत्रिणीशी फोनवर बोलत होता. यावेळी त्याचा मैत्रिणीशी फोनवरुन बोलताना वाद झाला. यानंतर मैत्रिणीचा मित्र असलेल्या संकेत चव्हाण याने प्रथमेश याला फोन करुन ‘तू मला बाहेर भेट मी तुला बघतो, तुझ्यात दम असेल तर मला भेट’ अशी धमकी दिली. यानंतर प्रथमेश हा संकेत याला भेटण्यासाठी आरटीओ ब्रिज येथे गेला. रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास पाऊस पडत असल्याने प्रथमेश हा आरटीओ ब्रिज येथे आला. यावेळी संकेत याने प्रथमेश याला फोन करुन तु कुठे आहेस अशी विचारणा केली. प्रथमेश याने आपण आरटीओ ब्रिज याठिकाणी थांबलो असल्याचे सांगितले. यानंतर संकेत हा कारमधून आपल्या सोबत दोघा मित्रांना घेवून आरटीओ ब्रिज येथे आला. गाडीमधून उतरताच संकेत याने हातातील लोखंडी रॉडने प्रथमेश याला मारहाण केली. तसेच त्याच्यासोबत असलेल्या अन्य दोघांनी देखील प्रथमेश याला मारहाण केली. मारहाणीत प्रथमेश याच्या डाव्या पायाच्या ढोपरावर जबर दुखापत झाली. 

याप्रकरणी प्रथमेश याने रत्नागिरी शहर पोलिसांत संकेत याच्यासह अन्य दोघांविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी मारहाण करुन शिवीगाळ केल्याप्रकरणी संशयितांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कायदा कलम ११८ (१), ११५ (२), ३५२, ३५१(२) नुसार गुन्हा दाखल केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:14 19-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow