संगमेश्वर : गुरववाडीत स्वखर्चाने उभारली निवारा शेड

Sep 19, 2024 - 13:49
 0
संगमेश्वर : गुरववाडीत स्वखर्चाने उभारली निवारा शेड

संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील ग्रामपंचायत फणसवणे गुरववाडी येथील स्थानिक ग्रामस्थ आणि मुंबई मंडळ यांच्या सहकायनि अंत्रवली रस्त्यावर गुरववाडी फाट्याजवळ स्वखचनि प्रवासी निवारा शेड उभारण्यात आली आहे. त्यामुळे येथील प्रवासी ग्रामस्थांची गैरसोय दूर झाली आहे.

फणसवणे महसूल गाव जरी एक असले, तरीही ग्रामपंचायत कार्यालये दोन आहेत. त्यापैकी ग्रामपंचायत गुरववाडीत सुमारे साडेतीनशे लोकवस्ती आहे. या ठिकाणी वौद्धवाडी, गुरववाडी, बालवे, गराडे आणि ब्राह्मण वाड्या आहेत. या गावासाठी एसटी महामंडळाच्या दोन फेऱ्या व्हाया शेबवणे करत असल्यामुळे प्रवाशांना ऊन-पावसात लांबेवाडी फाट्यावर उभे सहावे लागते.

या ठिकाणी प्रवासी निवारा शेड व्हावी म्हणून गेली अनेक वर्षांची मागणी होती; मात्र प्रशासनाकडून जमीन मिळत नव्हती. काही अटींमुळे ते शक्य होत नव्हते. स्थानिक ग्रामस्थांनी निवारा शेडसाठी जमीन मिळावी म्हणून प्रयत्न सुरू केले होते. त्याला गावातील लांबे कुटुंबीयांनी प्रतिसाद दिला. पैगंबरवासी इब्राहिम महंमद लांबे आणि जहिरा इब्राहिम लांबे यांच्या स्मरणार्थ इरफान, सज्जाद आणि साजिद इब्राहिम लांबे, तर मुलगी श्रीमती समिरा शकील पाटणकर यांनी निवारा शेडसाठी विनामोबदला जमीन दिली.

गुरववाडी ग्रामस्थ आणि मुंबई मंडळ यांनी स्वखचनि आणि स्थानिक कारागीरांच्या मदतीने या ठिकाणी शेडचे बांधकाम पूर्ण केले. या शेडचे नुकतेच जमीन मालकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून लोकार्पण करण्यात आले, त्यावेळी गुरववाडी ग्रामस्थांच्या वतीने जमीनमालकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गावच्या प्रथम नागरिक सरपंच शारदा तांबे, उपसरपंच मोहन गुरव, माजी सरपंच विठ्ठल गुरव, दगडू कदम, गणपत गुरव, पुरषोत्तम वनये, नसीर दसुरकर, अशोक विचारे, गणपत गाराटे, असल्लम डावे, प्रशांत विचारे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रशासनाच्या सहकार्याविना सुविधा प्रशासनाकडून सहकार्य मिळण्याची अपेक्षा असलेल्या ग्रामस्थांनी बराच काळ प्रतीक्षा केली; मात्र ग्रामस्थांना सहाकार्य मिळाले नाही. त्यामुळे प्रशासनाच्या सहकार्याविना ग्रामस्थांनी एकजुटीने निवारा शेड उभी केली. या माध्यमातून ग्रामस्थांनी स्वतःच सुविधा उपलब्ध करून देत प्रशासनाला चपराक दिली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:17 PM 19/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow