संगमेश्वर-डिंगणी मार्गावर वाहतूककोंडी

Sep 19, 2024 - 13:55
 0
संगमेश्वर-डिंगणी मार्गावर वाहतूककोंडी

संगमेश्वर : संगमेश्वर- फुणगूस मार्गावर सीएनजीच्या अवजड गाड्या येथील पंपावर बाहेर उभ्या केल्या जात असल्याने वाहनचालकांना त्रास होत आहे. हा रस्ता अरुंद असल्यामुळे वारंवार वाहतूककोंडी होत आहे.

डिंगणी येथील सीएनजी पंपावर सीएनजी भरण्यासाठी अवजड वाहने येत असतात. गॅस भरलेल्या गाड्या रस्त्याशेजारी उभ्या करून ठेवण्यात येतात. सीएनजी पंपातून संदेश मिळाल्यानंतर गॅस भरण्यासाठी गाड्या पुढे नेण्यात येतात. याबाबत संगमेश्वर पोलिसांनी मार्गदर्शन करूनही गाड्या पुढे नेऊन पंपाच्या बाहेर लावल्या जात असल्याने या मार्गावरून गणपतीपुळे, न करजुवे डिंगणी गावाकडे जाणाऱ्या वाहनचालकांना अधिक त्रास सहन  करावा लागतो. मुंबई-गोवा महामार्गाचे  चौपदरीकरणाचे काम सुरू असल्यामुळे गणपतीपुळेकडे जाणाऱ्या गाड्या निवळीमार्गे संगमेश्वरला न जाता डिंगणी रस्त्याचा वापर करतात. वेळेच्यादृष्टीने हे सोपे जाते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक वाढलेली आहे.

हा रस्ता अरूंद असल्यामुळे वाहने सावकाश हाकावी लागतात तसेच बाजूपट्ट्या धोकादायक असल्यामुळे अनेक गाड्या ज्या सीएनजी भरण्यासाठी येतात त्या रस्त्याच्या कडेला लावण्यात येतात. त्यामुळे पुढे जाण्यासाठी रस्ता शिल्लक नसल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते तसेच चालकांना वेळ खर्च करावा लागतो. अवजड वाहनांच्या गाड्या मध्येच थांबवत असल्यामुळे हा प्रश्न निर्माण होतो. याबाबत पोलिसांनी दिलेल्या सूचनेनुसार, वाहने पंपापासून सुरक्षित अंतरावर वाहतूककोंडी होणार नाही अशा ठिकाणी उभी करावीत, अशी मागणी स्थानिक लोकांकडून होत आहे. या विषयी संबंधित कार्यालयाला निवेदन देणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सुभाष लांजेकर यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:23 PM 19/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow