Bandra - Madgaon Express : वांद्रे टर्मिनस-मडगाव एक्स्प्रेस सुरु, वेळापत्रक ते तिकीट दर जाणून घ्या संपूर्ण माहिती एका क्लिकवर..

Aug 29, 2024 - 14:32
 0
Bandra - Madgaon Express : वांद्रे टर्मिनस-मडगाव एक्स्प्रेस सुरु, वेळापत्रक ते तिकीट दर जाणून घ्या संपूर्ण माहिती एका क्लिकवर..

मुंबई : 170 वर्ष नंतर पहिल्यांदा वसई पनवेल करून कोकणात ट्रेन जाणार आहे. ही ट्रेन कायमस्वरुपी सुरु राहणार आहे. वांद्रे टर्मिनस येथून ही ट्रेन मडगावसाठी सुटेल. ही ट्रेन पश्चिम रेल्वे चालवणार आहे.

ही गाडी बुधवार आणि शुक्रवारी वांद्रे येथून सुटेल तर मडगाव येथून मंगळवार आणि गुरुवारी सुटेल.
 
वांद्रे टर्मिनसहून ट्रेन सकाळी 6.50 मिनिटांनी सुटेल. बोरिवलीला 7.23 वाजता, वसई रोडला,7.50 वाजता, भिवंडी रोडला 8.50 वाजता, पनवेलला 9.55 वाजता, रोहा 11.15 वाजता, वीर 12.00 वाजता, चिपळूणला 13.25, रत्नागिरीला 15.35, कणकवलीत 18.00, सिंधुदुर्ग 18.20, सावंतवाडी रोड 19.00 वाजता थिविमला 20.00 ,करमाळीला 20.30 तर मडगावला 22.00 वाजता पोहोचेल. रोहा आणि रत्नागिरीत ट्रेन 5 मिनिट तर वसई रोडला 25 मिनिटं थांबेल.
 
मडगाववरुन वांद्रे टर्मिनससाठी ही एक्स्प्रेस मडगावला 7.40 वाजता सुटेल. करमाळीत 8.10 वाजता, थिविमला 8.32, सावंतवाडी रोड 9.00, सिंधुदुर्ग 9.36, कणकवली 9.50, रत्नागिरी 13.30 , चिपळूण 15.20, वीर 17.30 , रोहा 18.45, पनवेल 20.10, भिवंडी रोड 21.05, वसई रोड 22.05, बोरिवली 22.43 आणि वांद्रे टर्मिनसला 23.40 ला पोहोचेल.
 
वांद्रे टर्मिनस ते मडगाव या प्रवासासाठी स्लीपर डब्याचं तिकीट 420 रुपये, एसी थ्री टियर इकोनॉमी 1050 रुपये, एसी थ्री टियर 1135, एसी 2 टियर 1625 रुपये इतकी आहे. मडगावहून वांद्रे टर्मिनसला गाडी मंगळवारी आणि गुरुवारी सुटेल.
 
मुंबईतील पश्चिम उपनगरात राहणाऱ्या कोकणातल्या चारमान्यांच्या मागणी मान्यता देत रेल्वे बोर्डानं पश्चिम रेल्वेला वांद्रे - मडगाव एक्स्प्रेस सुरु करण्यास मंजुरी दिली आहे.
 
या एक्स्प्रेसला बोरिवली, वसई, भिवंडी, पनवेल, रोहा, वीर, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदूर्ग, सावंतवाडी, थिविम आणि करमाळी या स्टेशनवर थांबा आहे. खेडला देखील थांबा दिला जावा अशी मागणी करण्यात येत आहे.

पश्चिम रेल्वे प्रथमच वसई पनवेल या कॉरिडॉरचा वापर करुन बांद्रा टर्मिनस ते मडगाव एक्स्प्रेस सुरु करणार आहे. यामुळं वसई, विरार आणि बोरिवली मधील नागरिकांना कोकणात जाण्यासाठी फायदा होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:01 29-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow