रत्नागिरी : रिळ,उंडीत आजपासून जमीन मोजणी प्रक्रियेला सुरुवात

Sep 20, 2024 - 09:49
Sep 20, 2024 - 09:53
 0
रत्नागिरी : रिळ,उंडीत आजपासून जमीन मोजणी प्रक्रियेला सुरुवात

रत्नागिरी : तालुक्यातील रिळ आणि उंडी गावामध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने औद्योगिक क्षेत्र जाहीर केले आहे. यामध्ये दोन्ही गावांतील मिळून ५१३ एकर जागेचे भूसंपादन करण्यात येणार आहे. त्यासाठी खातेदारांना नोटिसा देऊन भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शुक्रवारपासून (ता. २०) जमीन मोजणीला सुरवात होणार आहे.

तालुक्यातील रिळ आणि उंडी औद्योगिक क्षेत्राची अधिसूचना जारी झाली आहे. यामध्ये १५२.९५ हेक्टर रिळची तर उंडीतील ६०.४० हेक्टर अशी एकूण २१३.३५ हेक्टर म्हणजे ५१३ एकर जमीन संपादित करण्यात येणार आहे. संपादित होणाऱ्या क्षेत्राचा शासकीय दराच्या ४ पट वाढीव मोबदला मिळणार आहे. उपविभागीय अधिकारी कार्यालयात याबाबत चौकशी केली असता, रिळ गावातील १३६ सातबारावरील १५३ हेक्टर जमीन संपादित होणार आहे. उंडी गावामध्ये ४९ सातबारा भागांवरील ६० हेक्टर जमीन संपादित होणार आहे. या सर्व जमीन मालकांना शासकीय मूल्याच्या चारपट एवढा मोबदला मिळणार आहे. हा मोबदला जमीन मालकांना देण्याची तयारी महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाने दाखवली आहे. शुक्रवारपासून ही जमीन मोजणी प्रक्रिया सुरू होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:15 AM 20/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow