संगमेश्वर : नवनिर्माण महाविद्यालयातर्फे निर्माल्य संकलन

Sep 20, 2024 - 11:16
Sep 20, 2024 - 12:17
 0
संगमेश्वर : नवनिर्माण महाविद्यालयातर्फे निर्माल्य संकलन

संगमेश्वर : नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या नवनिर्माण महाविद्यालय, लोवले संगमेश्वर येथील महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्या विद्यार्थ्यांनी गणेश विसर्जनाचे औचित्य साधून संगमेश्वर बाजारपेठ येथे निर्माल्य संकलनाचा उपक्रम राबवला. या प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थी, प्राध्यापकांनी गणेश विसर्जनावेळी आणले जाणारे निर्माल्य नदीत न टाकता त्याचे संकलन केले.

नवनिर्माण महाविद्यालयाच्या प्राचार्य संजना चव्हाण आणि सहकारी प्राध्यापक यांनी सामाजिक भान जपण्यासाठी निर्माल्य संकलनाचा उपक्रम राबवला, गणेश विसर्जनावेळी मोठ्या प्रमाणात फुले, हार, फळे, दुर्वा आणि अन्य साहित्य विसर्जित केले जाते. विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी नदीकिनारी निर्माल्य जमा होते आणि ते पायदळी येण्याची शक्यता असते असेच कचऱ्यामुळे पाणी दूषित होते. दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन निर्माल्य संकलनाचा उपक्रम हाती घेण्यात आला. गणेश विसर्जनावेळी निर्माल्य पाण्यात न टाकता या संकलन केंद्रावर जमा करावे, असे आवाहन विद्यार्थ्यांनी केले.

या प्रसंगी विसर्जनासाठी आलेल्या सर्व भक्तगणांनी निर्माल्य विद्यार्थ्यांच्या हाती दिले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी गणेश विसर्जनासाठी आलेल्या काही भक्तगणांशी संवाद साधला तसेच निर्माल्य नदीत टाकून प्रदूषण करण्यापेक्षा जमा करावे आणि त्याच्यापासून खत निर्माण करण्यात येणार असल्याचे सांगितले. अनेक भक्तगणांनी सहकार्य केले. निर्माल्य संकलनावेळी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रमुख अनिल नेमण, तेजस्विनी सावंत आणि प्राध्यापक दीपक भोसले उपस्थित होते.

गणेशभक्तांकडून सहकार्य
विद्यार्थ्यांनी गणेश विसर्जनासाठी आलेल्या काही भक्तगणांशी संवाद साधला तसेच निर्माल्य नदीत टाकून प्रदूषण करण्यापेक्षा जमा करावे आणि त्याच्यापासून खत निर्माण करण्यात येणार असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांच्या आवाहनाला भक्तगणांनी सहकार्य केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:40 PM 20/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow