चिपळूण : 'स्मृतिगंध' पुस्तकाचे सावर्डेत प्रकाशन
चिपळूण : स्व. सुरेश बागवे यांचे व्यक्तिमत्त्व आज वैचारिक क्रांतीतून सर्वांच्या मनात रुजलेले आहे. त्यांच्या द्वितीय स्मृती दिनी त्यांनी केलेल्या परिवर्तनवादी विचारांची पेरणी आणि त्यांचा सहभाग यावर 'स्मृतिगंध' नावाचे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. यातूनच खऱ्या अर्थाने स्व. सुरेश बागवे यांच्या कार्याचा नंदादीप सदैव तेवत राहील, असे गौरवोद्वार कुणबी संघ शाखा ग्रामीण चिपळूण अध्यक्ष संतोष (भाई) कुळे यांनी काढले.
तालुक्यातील सावर्डे येथे स्व. सुरेश बागवे गुरुजी यांच्या निवासस्थानीच त्यांचा द्वितीय स्मृतिदिन साजरा करण्यात आला. यावेळी त्यांच्या जीवनावर आधारित स्मृतिगंध पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी मारुती जोयशी, बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष सुरेश भायजे, लोक कलावंत बाबू गुडेकर, जयराम बागवे, अनंत शिगवण, गणपत भायजे, विलास डिके, घनःशाम घडशी, स्नेहा बागवे, प्रा. संदीप येल्ये आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:34 PM 20/Sep/2024
What's Your Reaction?