गुहागर : तळवली अंगणवाडी इमारतीचे भूमिपूजन

Sep 20, 2024 - 14:16
 0
गुहागर : तळवली अंगणवाडी इमारतीचे भूमिपूजन

गुहागर : तालुक्यातील तळवली आगरवाडी अंगणवाडी शाळेच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष सुरेश सावंत यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.

महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या निधीतून तळवली आगरवाडी अंगणवाडी काम मंजूर झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुरेश सावंत यांनी या इमारतीच्या बांधकामासाठी निधी मंजूर करून आणण्यात यश मिळवले.

या भूमीपूजनावेळी महाराष्ट्र युवक प्रदेश सरचिटणीस साहील आरेकर, सरपंच संतोष जोशी, ग्रा.पं. सदस्य सुनील मते, मानसी पोफळे, काशीराम डाकवे, प्रकाश शिगवण, देऊळवाडी अध्यक्ष संदीप महाडिक, यशोदा सांगळे, राकेश पवार, गुरुनाथ कारेकर, ग्रामविकास अधिकारी बागुल, अंगणवाडी सेविका सुनीता सांगळे, मदतनीस पवार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:43 PM 20/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow