चिपळूण : बहादूरशेखनाका येथील उड्डाणपुल प्रतीक्षेत

Jul 2, 2024 - 17:24
 0
चिपळूण : बहादूरशेखनाका येथील उड्डाणपुल प्रतीक्षेत

चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहादूरशेखनाका येथे उड्डाणपुलाचे काम सुरू असताना १६ ऑक्टोबर २०२३ ला पुलाच्या गर्डरसह क्रेन कोसळली होती. यानंतर लोकप्रतिनिधींसह या कामाच्या दर्जाबाबत चीड व्यक्त करण्यात आली. या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्या अधिकारी व ठेकेदार कंपनीवर कारवाईची जोरदार मागणी करण्यात आली; मात्र या दुर्घटनेला नऊ महिन्यांचा कालावधी लोटूनही अद्याप कोणावरही कारवाई झालेली नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे तर दुसरीकडे अतिरिक्त गर्डर पिलर उभारण्याचे काम सुरू असले तरी या उड्डाणपुलाचे काम कधी पूर्णत्वास जाणार? असा सवाल जनतेमधून उपस्थित केला  जात आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पेढे-परशुराम ते खेरशेत या ३४ किलोमीटरदरम्यान चौपदरीकरणातील चिपळूण टप्प्यात बहादूरशेख नाका ते प्रांत कार्यालयापर्यंत हा उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. साधारणपणे या पुलाची लांबी १८४० मीटर तर रूंदी ४५ मीटर इतकी असून हा पूल पेढे-परशुराम ते खेरशेत या ३४ किलोमीटरदरम्यान चौपदरीकरणातील चिपळूण टप्प्यात बहादूरशेख नाका ते प्रांत कार्यालयापर्यंत हा उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. साधारणपणे या पुलाची लांबी १८४० मीटर तर रूंदी ४५ मीटर इतकी असून हा पूल कोकणातील महामार्गात सर्वाधिक लांबीचा ठरला आहे. या पुलासाठी एकूण ४६ पिलर उभारण्यात आले असून, बहादूरशेखनाका येथून या पुलाचे काम पावसाळ्यात सुरू झाले होते; मात्र १६ ऑक्टोबर २०२३ ला या पुलाचा काही भाग कोसळला. पूल कोसळल्यानंतर त्याच्या उभारणीवर टीकाटीप्पणी सुरू झाली. पूल कोसळल्यानंतर उभारणीतील काही त्रुटी प्राथमिकदृष्ट्या समोर आल्यानंतर त्यावर मंथन सुरू झाले. केंद्रातून तज्ज्ञ समिती पाठवून पुलाची तपासणी करण्यात आली.

उड्डाणपुलाचे काम वेळेत करा
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहादूरशेखनाका येथील उड्डाणपुलाचे काम सुरू असताना गर्डरसह क्रेन कोसळली होती. त्याचे काम सुरू असून, अतिरिक्त गर्डर पिलर उभारले जात आहेत. हे काम लवकर पूर्ण व्हावे, अशी परिसरातील नागरिकांतून मागणी होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:52 PM 02/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow