Ratnagiri : राज्य परिवहन विभागाच्या विविध पास सवलत योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा : प्रज्ञेश बोरसे

Jun 7, 2024 - 11:51
 0
Ratnagiri : राज्य परिवहन विभागाच्या विविध पास सवलत योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा : प्रज्ञेश बोरसे

रत्नागिरी : यात्रा सवलत, अभ्यास दौरे, यात्रा सहली, महिला सन्मान योजना, अमृत ज्येष्ठ नागरिक, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यार्थिनी पास सवलत अशा प्रकारच्या विविध योजना राज्य परिवहन विभागामार्फत राबविल्या जात आहेत. या सवलतींच्या योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन राज्य परिवहन विभागाचे विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी केले आहे.

राज्य परिवहन रत्नागिरी विभागामार्फत प्रवाशांच्या सोयीसाठी खास जादा यात्रा सवलतीच्या माध्यमातून सहल आयोजित करण्यात येतात. महिला बचत गट, ज्येष्ठ नागरिक संघ व्यापारी संघ, क्रीडा मंडळे, ग्रामस्थ मंडळ, शेतकरी संघ सहकारी संस्था यांच्या अभ्यास दौऱ्यांसाठी विविध सहलींची आयोजन त्यांच्या सोयीनुसार आणि मागणीवरून करण्यात येईल, आवश्यकतेनुसार संबंधितांनी मागणी केल्यास बसेस देण्यात येतील आणि आपल्या पर्यटन क्षेत्राच्या दर्शन सहलींचे आयोजन महामंडळाकडून करण्यात येते. यासाठी प्रवाशांचे गटप्रमुख यांनी प्रत्येक आगारात संपर्क साधावा, जेणेकरून त्यांच्या सोयीने सहलींचे नियोजन करणे सुलभ होईल.

सर्व समाज घटक प्रवाशांना धार्मिक स्थळे, पर्यटन स्थळे येथे जाण्यासाठी व परत येण्यासाठी प्रत्येक आगाराकडून टू बाय टू. एम एस बॉडी बसेस दिल्या जातील. वर्षा सहलीसह विविध पर्यटन क्षेत्रात जाण्यासाठी प्रवासी बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

महिला सन्मान योजना अंतर्गत महिलांसाठी ५० टक्के तसेच अमृत ज्येष्ठ नागरीक ७५ वर्ष पूर्ण प्रवाशांना मोफत प्रवास सवलत आहे आणि ६५ वर्षे पूर्ण झालेल्या प्रवाशांना प्रवास भाड्यामध्ये ५० टक्के सवलत आहे. प्रवासी सवलतीने समूह गटांना बसेस उपलब्ध करून देण्यात येतील. या विशेष पर्यटन सहल बसेस मधून सर्व प्रकारचे सवलती दिल्या जाणार आहेत.

एक वस्ती दोन दिवस, दोन वस्ती तीन दिवस आणि तीन वस्ती चार दिवस अशा प्रवासासाठी या बसेस पूर्व नियोजनानुसार आगाऊ संपर्क साधल्यास उपलब्ध करून देण्यात येतील. त्याचप्रमाणे महामंडळाकडून देण्यात येणाऱ्या विविध सवलतींपैकी म्हणजेच ४ दिवस व ७ दिवस आवडेल तेथे प्रवास पास, रेस्क्युहोम मुलांसाठी सहलीसाठी, दैनंदिन प्रवास करणाऱ्या नोकरदार पुनवर्सन केंद्रातील मानसिकदृष्टया विकलांगता, कर्मचारी वर्गासाठी २० दिवसाचे प्रवास भाडे भरून ३० दिवस प्रवास करण्याचे ५० दिवसाचे प्रवास भाडे भरून ९० दिवसांचा प्रवास करता येईल.

विद्यार्थ्यांना शाळेमध्ये पास वितरित करण्यासाठी नियोजन करण्याचे हेतूने संस्थांकडून आगारात संपर्क साधण्यात यावा जेणेकरून विद्यार्थ्यांचा वेळ व प्रवास भाडे वाया जाणार नाही. यासाठी सर्व आगार व्यवस्थापक यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यार्थिनी पासेस सवलत ही विद्यार्थिनींच्या शैक्षणिक धोरणाप्रमाणे व सुरक्षिततेसाठी शासनाकडून मोफत राबविण्यात येते. या योजनेचा सर्व विद्यार्थिनींसाठी आणि विद्यार्थ्याना ६६.६७ टक्के प्रवास भाड्यामध्ये सवलत लाभ घेता येईल. तसेच शैक्षणिक संस्थाना पासेस वितरित करून घेण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे.    

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:20 07-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow