वैश्यगुरु श्री श्री वामनाश्रम स्वामींचे आज रत्नागिरीत आगमन

Jun 8, 2024 - 10:49
 0
वैश्यगुरु श्री श्री वामनाश्रम स्वामींचे आज रत्नागिरीत आगमन

रत्नागिरी : काशी तथा हळदीपूर मठाधिपती वैश्यगुरु श्री श्री वामनाश्रम स्वामींचे आज ८ जून रोजी श्री राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्था, रत्नागिरी येथे सायंकाळी ७ वाजता आगमन होणार आहे. ८ व ९ जून हे दोन दिवस स्वामींचा मुक्काम रत्नागिरी येथील श्री राधाकृष्ण मंदिरात असणार आहे. यानिमित्ताने मंदिर संस्थेकडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवसांच्या धार्मिक कार्यक्रमानंतर दिनांक ९ जून रोजी सायंकाळी ६.३० मिनिटांनी स्वामींचे संगमेश्वरसाठी प्रयाण होणार असल्याची माहिती श्री राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्थेकडून देण्यात आली आहे. स्वामीजींच्या या आगमन, आशीर्वचन व दर्शन सोहळ्याचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

कार्यक्रम पत्रिका खालीलप्रमाणे

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow