ज्येष्ठांनी डोळ्यांची तपासणी करून घ्यावी : डॉ. अश्विन वैद्य

Jun 12, 2024 - 13:29
Jun 12, 2024 - 13:39
 0
ज्येष्ठांनी डोळ्यांची तपासणी करून घ्यावी : डॉ. अश्विन वैद्य

रत्नागिरी : दृष्टी चांगली असेल तर जीवन समाधानाने जगता येते. त्यामुळे ज्येष्ठांनी वेळोवेळी आपल्या दृष्टीची तपासणी करून घ्यावी, डोळ्यांची काळजी घ्यावी, असे आवाहन येथील प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ, डॉ. आश्विन वैद्य यांनी केले. श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्टा मासिक रौप्य महोत्सवी मेळाव्यात ज्येष्ठांनी डोळ्यांची घ्यावयाची काळजी या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्टाची रौप्य महोत्सवी सभा श्री राम मंदिरात झाली. ते म्हणाले, मधुमेह आणि रक्तदाब यामुळे डोळ्यांच्या विशिष्ट भागांना इजा पोहोचते. मोतीबिंदू आणि काचबिंदू होऊ नये यासाठी मधुमेह दूर ठेवावा, प्रेशर नेहमी नियंत्रणात ठेवावा, डोळ्यांचा प्रेशर वेळोवेळी डॉक्टरकडून तपासून घ्यावा, असे आवाहनही डॉक्टर वैद्य यांनी केले.

श्रीराम मंदिर संस्था आणि मंगलमूर्ती प्रतिष्ठानच्या प्रमुख उर्मिला घोसाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम झाला. या वेळी व्यासपीठावर श्रीराम मंदिर संस्थेचे कार्याध्यक्ष अॅड. मिलिंद पिलणकर, श्रीराम मंदिर कट्टाचे अध्यक्ष तथा संयोजन प्रमुख अण्णा लिमये, ज्येष्ठ समाजसेवक कुमार शेट्ये, श्रीराम मंदिर संस्था, मंगलमूर्ती प्रतिष्ठान आणि ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य, कार्यकारणी पदाधिकारी उपस्थित होते.

मंगलमूर्ती प्रतिष्ठानचे कार्यकर्ते सुधाकर सावंत यांनी श्रीराम मंदिरात ज्येष्ठांच्या चांगल्या आरोग्यासाठी श्रीरामाला साकडे घातले. श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्टाचे अध्यक्ष अण्णा लिमये यांचा सत्कार घोसाळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. योग प्रशिक्षिका स्मिता साळवी, कुमार शेट्ये, डॉक्टर अश्विन वैद्य आणि मान्यवरांचे यथोचित सत्कार करण्यात आले. सूत्रसंचालन डॉ. दिलीप पाखरे यांनी केले. अॅड. पिलणकर यांनी आभार मानले.

जून महिन्यात वाढदिवस असलेल्या ज्येष्ठांना या वेळी गुलाबपुष्प आणि शुभेच्छापत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे संतोष रेडीज, कट्टाचे सचिव सुरेंद्र घुडे आणि रमाकांत पांचाळ यांनी परिश्रम घेतले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:12 PM 12/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow