गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या ११ वी कला शाखा १९९० च्या माजी विद्यार्थी बॅचचे स्नेहसंमेलन उत्साहात

Jun 12, 2024 - 13:38
 0
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या ११ वी कला शाखा १९९० च्या माजी विद्यार्थी बॅचचे स्नेहसंमेलन उत्साहात

त्नागिरी : गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कै. ज. शं. केळकर हॉलमध्ये दि. ९ जून २०२४ रोजी महाविद्यालयाच्या १९९०च्या अकरावी कला शाखेचे स्नेहसंमेलन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.

सुरुवातीला १९९० बॅचचे सर्व विद्यार्थी ३४ वर्षांपूर्वीच्या आपल्या वर्गात एकत्र झाले. त्यानंतर या बॅचला अर्थशास्त्राचे अध्यापन करणारे प्रा. सुशील वाघधरे यांनी खूप सुंदररित्या अध्यापन केले. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना ३४ वर्ष मागे जाऊन परत एकदा अर्थशास्त्र हा विषय समजून घेताना मजा आली.

त्यानंतर मुख्य कार्यक्रम सुरु झाला. यावेळी माजी गुरुवर्य असलेले अध्यापक आणि अध्यापिका यांचा सत्कार सोहोळा विविध माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते संपन्न झाला. यामध्ये प्रा. श्रीम. सृजन शेंड्ये, प्रा. सौ. मीनाक्षी केळकर, प्रा. सौ. वैशाली हळबे, प्रा. श्री. एम. ए. यादव, प्रा. श्री. मुनीर मुलाणी, प्रा. श्री. सुशील वाघधरे, प्रा. श्री. चंद्रकांत घवाळी, प्रा. श्री. प्रकाश दीक्षित, प्रा. श्री. बी. एच. दीपंकर आणि सध्याचे कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी या गुरुवर्यांचा समावेश होता. याप्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुवर्यांच्या आणि महाविद्यालयातील ३४ वर्षापूर्वीच्या आठवणींना उजाळा दिला तसेच आपल्या गुरुर्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

प्रा. श्रीम. सुजन शेंड्ये, प्रा. सौ. मीनाक्षी केळकर, प्रा. सौ. वैशाली हळबे, प्रा. श्री. मुनीर मुलाणी आणि प्रा. सुनील गोसावी यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी माजी विद्यार्थ्याना भेटून आनंद झाल्याचे नमूद केले.

तसेच विविध क्षेत्रात उज्ज्वल सुयश संपादन करून कला शाखेतील विद्यार्थ्यांनी आदर्श दाखवून दिले आहे असे सांगितले. आम्हा सर्व शिक्षांना या 'गुरुवर्य सत्कार समारंभाला' निमंत्रित करून माजी विद्यार्थ्यांच्या बॅचने आम्हालाही काही वर्ष मागे जाऊन आल्याचा आनंद झाला आहे; असे आवर्जून नमूद केले. गुरुवर्य सत्कार समारंभानंतर सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. त्यानंतर 'विविधरंगी सांस्कृतिक कार्यक्रम' संपन्न झाले. यामध्ये गीत गायन, मनोरंजन आणि सामुहिक नृत्य या कार्यक्रमांचा समावेश होता.

संपूर्ण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी १९९० साली कला शाखेत असलेल्या श्री. नितीन मिरकर, श्री. चंद्रकांत मांडवकर, अॅड. दत्ता खानविलकर, श्री. गणेश जोशी, सौ. लीना घाडीगावकर, सौ. मीना तेंडुलकर, सौ. रोहिणी प्रभुदेसाई, श्री. नितीन करंबेळे, श्री. दिनेश रेमुळकर, श्री. दिपक खानविलकर, श्री. उदयराज सावंत, श्री. अभिजित शेट्ये, श्री. आदेश कांबळे, श्री. संजय तांबे, श्री. रुपेश मयेकर, श्री. नितीन कोतवडेकर,
श्री. सुभाष शेलार यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमचे प्रास्ताविक श्री. नितीन मिरकर आणि सूत्रसंचालन श्री. प्रशांत सनगरे यांनी केले. चहापानंतर या रंगतदार कार्यक्रमाची सांगता झाली. सर्वांच्या चेहऱ्यावर खुप वर्षांनी एकत्र आल्याचे समाधान दिसत होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:07 12-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow