रत्नागिरी : दिवाळीच्या पूर्वसंध्येला पावसाची हजेरी

रत्नागिरी : दिवाळीच्या पूर्वसंध्येला बुधवारी (ता. ३०) सायंकाळी अचानक ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह रत्नागिरीतील ग्रामीण भागात जोरदार पाऊस झाला.

या पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले असून, कापणी केलेली भात भिजले आहेत.

गेले चार दिवस वातावरण निवळलेले असतानाच बुधवारी दुपारी पावसाने तालुक्यात हजेरी लावली. बुधवारी सकाळी दिवसभर ढगाळ वातावरण होते. दुपारी कडकडीत ऊन होते. सायंकाळी पावसाने हजेरी लावली. त्यानंतर पुन्हा सायंकाळी विजांच्या कडकडाटासह पावसाने जोर धरला. ढगांच्या गडगडाटासह वेगवान वारेही वाहत होते.

सुमारे अर्ध्या तासाहून अधिक काळ पाऊस पडला. या पावसामुळे भातशेती आडवी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. भात कापणी उरकण्यावर भर असतानाच पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

Mahrashi karve ANM

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:22 31-10-2024