देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील माभळे घडशीवाडीतील राखी घडशी हिने उज्ज्वल यश मिळवले आहे. राखीने मेट्रो चालक पदाला गवसणी घातली आहे. या यशाबद्दल तिचा नुकताच संगमेश्वर पोलिस ठाण्यात सत्कार करण्यात आला.
संगमेश्वरातील पैसा फंड संगमेश्वर येथे बारावीपर्यंत शिक्षण घेऊन सावर्डे येथे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन हा दोन वर्षांचा कोर्स करून ऑनलाईन भरतीसाठी अर्ज केल्याने त्यामधून तिची निवड झाली. त्यानंतर तीन महिन्याचे खास प्रशिक्षण घेऊन मेट्रो चालक पदावर रुजू झाली.
ही बाब येथील विद्यार्थ्यांसाठी नक्कीच भूषणावह असल्याचे सांगून तिच्या पुढील वाटचालीस पोलिस निरीक्षक अमित यादव, पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत कांबळे, पोलिस उपनिरीक्षक प्रशांत शिंदे यांनी तिला शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी आजवरच्या प्रवासात ज्यांचे सहकार्य लाभले, त्यांचे राखीने आभार मानले. यावेळी संदीप घडशी, प्रकाश घडशी, आजोबा घडशी, कृष्णा घडशी व पोलीस स्टेशनचे कर्मचारी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:10 02-11-2024