लांजा : येथील लाकूड व्यावसायिकांना सध्या शासनाच्या अनेक अडचणींना, अटीं-शर्तिना सामोरे जावे लागत आहे. याबाबत आपण लवकरच लाकूड व्यावसायिकांना न्याय मिळून देण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन सिंधुरत्न समितीचे सदस्य किरण सामंत यांनी लांजा तालुक्यातील व्यावसायिकांना दिले.
लांजा शहरात नुकतीच एका बैठकीप्रसंगी सिंधुरत्न समितीचे सदस्य किरण सामंत यांची लांजा तालुक्यातील लाकूड व्यापाऱ्यांनी भेट घेतली. या बैठकीवेळी किरण सामंत बोलत होते. यावेळी किरण सामंत उपस्थित लाकूड व्यापारांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, कुणाला माहीत नसेल की, आम्हीही पूर्वीचे लाकूड व्यापारी. माझ्या वेंगुर्ला गावात आमची स्वतःची सॉमिल असून, आमचा चुलत भाऊ त्या ठिकाणी काम पाहतो. त्यामुळे लाकूड व्यापाऱ्यांना कोणत्या अडचणी आणि त्रासाला सामोरे जावे लागते, याची जाणीव आहे. लांजा- राजापूरच्या लाकूड व्यावसायिकांना चांगले दिवस येतील, असे काम तुम्हाला करून दाखवू, असा विश्वास यावेळी सामंत यांनी दिला.
सह्याद्रीच्या पायथ्याशी लागू असलेल्या इको सेन्सिटिव्ह झोनमुळे येथील गावांमध्ये वृक्षतोड करता येत नाही. तसेच कोणतेही बांधकाम करता येत नाही ही अडचणीत गेली १० वर्षे भेडसावत आहे. याला शिथिलता मिळावी, यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्याचे काम सुरू आहे, असे किरण सामंत यावेळी म्हणाले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:51 PM 24/Sep/2024