कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये घुमला मराठी डंका! ‘अभिजात मराठी OTT’ चे जागतिक स्तरावर दिमाखात लाँच

कान्स (फ्रांस):

आंतरराष्ट्रीय स्तरावर मानाच्या समजल्या जाणाऱ्या ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’ (Cannes Film Festival) मधून मराठी मनोरंजन विश्वासाठी एक अत्यंत अभिमानास्पद आणि ऐतिहासिक बातमी समोर आली आहे. कान्स येथील भारत पॅव्हेलियनमध्ये ‘अभिजात मराठी OTT’ चे जागतिक लाँच (Global Launch) अत्यंत दिमाखात पार पडले. १६ मे रोजी सायंकाळी झालेल्या या दिमाखदार सोहळ्याला चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज आणि आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी उपस्थित होते.

या ऐतिहासिक लाँचिंगनंतर चित्रपटसृष्टीतील नामांकित व्यक्तिमत्त्वे, निर्माते, सांस्कृतिक प्रतिनिधी आणि आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी यांच्यासाठी एका उच्चस्तरीय नेटवर्किंग डिनरचेही आयोजन करण्यात आले होते.

अशोक सराफ यांच्या नेतृत्वाखाली रेड कार्पेटवर ‘मराठी पाऊल पडते पुढे!’

या जागतिक लाँच सोहळ्याला मराठी चित्रपटसृष्टीचे महानायक अशोक सराफ, ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ, अभिनेत्री प्राजक्ता माळी, सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अंकिता वालावलकर, सुप्रसिद्ध अँकर जयंती वाघधरे आणि ‘अभिजात मराठी OTT’ चे संस्थापक केदार जोशी उपस्थित राहिले.

Radhakrushna patapedhi

विशेष म्हणजे, कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये अभिजात मराठीचे अधिकृत रेड कार्पेट प्रतिनिधित्व ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. या माध्यमातून मराठी सिनेमा, संस्कृती आणि डिजिटल कथाकथनाचा वारसा जागतिक व्यासपीठावर पोहोचवला जाणार आहे.


केवळ OTT नाही, तर ‘AI’ आधारित डिजिटल विश्व!

या सोहळ्यात मराठी आणि प्रादेशिक कंटेंटची वाढती जागतिक ओळख, प्रादेशिक कथांचा प्रभाव आणि डिजिटल मनोरंजनासाठी निर्माण होत असलेल्या नव्या संधींवर एका विशेष पॅनेल चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. ‘अभिजात मराठी’ हे केवळ एक साधे OTT प्लॅटफॉर्म नसून, त्यामध्ये मराठी सिनेमा, भक्ती, लाईफस्टाईल, इन्फोटेन्मेंट आणि AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) आधारित नव्या कथाकथनाचा समावेश असलेले एक व्यापक डिजिटल विश्व असणार आहे.

‘अभिजात’ दर्जाच्या प्रेरणेतून झाली निर्मिती

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेला ‘अभिजात भाषेचा’ दर्जा दिल्यानंतर जगभरातील मराठी भाषिकांचा सांस्कृतिक अभिमान जागा झाला आणि याच प्रेरणेतून ‘अभिजात मराठी OTT’ ची संकल्पना आकारास आली.

मराठी भाषेला हा बहुमान मिळवून देण्यासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही दृष्टी अधिक व्यापक करत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्राला जागतिक स्तरावर नवे बळ दिले. तसेच, राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी निर्माण केलेले नाविन्यपूर्ण आणि प्रोत्साहनात्मक वातावरण या चळवळीचा मुख्य आधारस्तंभ ठरले आहे. मराठी भाषा, साहित्य आणि सिनेमा जागतिक पातळीवर नेण्याच्या या प्रयत्नांमुळेच सध्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘अभिजात मराठी OTT’ ची जोरदार चर्चा सुरू आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:23 18-05-2026