रत्नागिरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत २१ मे पासून प्रवेशप्रक्रिया

रत्नागिरी : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया 21 मे 2026 पासून सुरू करण्यात येत असून इच्छुक उमेदवारांनी https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर जाऊन 21 मे 2026 पासून ऑनलाइन पद्धतीने प्रवेश अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

रत्नागिरीतील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी गटनिदेशक सी. आर. शिंदे (९९६७७७५३१७), श्रीमती व्ही. पी. पांचाळ (९०७५५८७६०६), श्रीमती एस. यू. जाधव (९४२००५१२०) यांच्याशी संपर्क साधावा.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये प्रवेश घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रमाणित कार्यपद्धतीची माहिती पुस्तिका ऑनलाइन स्वरूपात संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्ज नोंदवून झाल्यानंतर उमेदवारांनी नजीकच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये जाऊन आपला अर्ज निश्चित करावा व त्यानंतर विकल्प सादर करावेत. प्रवेश प्रक्रियेच्या विविध टर्प्यांबाबत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये समुपदेशन करण्यात येत आहे. यामध्ये उमेदवारांना विविध व्यवसाय अभ्यासक्रमांची परिपूर्ण माहिती देण्यात येईल. त्याअनुषंगाने दहावी उत्तीर्ण व अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येते की, व्यवसाय शिक्षण पूर्ण करून त्वरित रोजगार स्वयंरोजगार अथवा उच्च शिक्षणाच्या संधी प्राप्त होण्यासाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घ्यावेत.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत एक वर्ष कालावधी अभ्यासक्रमाचे अनुक्रमे डिझेल मेकॅनिक (प्रवेश क्षमता ४८), वेल्डर (प्रवेश क्षमता ४०), वुडवर्क टेक्निशियन (प्रवेश क्षमता २४), कॉम्प्युटर ऑपरेटर अॅण्ड प्रोग्रामिंग असिस्टंट (प्रवेश क्षमता ४८), इंटिरिअर डिझाइन डेकोरेशन (प्रवेश क्षमता ४८), पंप ऑपरेटर कम मेकॅनिक (प्रवेश क्षमता ४०), सुईंग टेक्नॉलॉजी (प्रवेश क्षमता २०), फूड प्रॉडक्शन जनरल (प्रवेश क्षमता २४), डेस्कटॉप पब्लिशिंग ऑपरेटर DTPO (प्रवेश क्षमता ४८) हे अभ्यासक्रम असून यामध्ये सुईंग टेक्नॉलॉजी, वेल्डर, वुडवर्क टेक्निशियन या व्यवसाय अभ्यासक्रमांकरिता शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण/अनुउत्तीर्ण अशी आहे. इतर एक वर्ष अभ्यासक्रमांकरिता शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण अशी आहे.

दोन वर्षे कालावधी अभ्यासक्रमाचे अनुक्रमे इलेक्ट्रिशियन वीजतंत्री (प्रवेश क्षमता २०), मेकॅनिक मोटार व्हेइकल (प्रवेश क्षमता ४८), रेफ्रिजरेशन अॅण्ड एअरकंडिशनर टेक्निशियन (प्रवेश क्षमता २४), ड्राफ्टसमन सिव्हिल (प्रवेश क्षमता २४), ड्राफ्टसमन मेकॅनिक (प्रवेश क्षमता २०), फिटर (प्रवेश क्षमता ४०), टर्नर (प्रवेश क्षमता ४०), मशिनिस्ट (प्रवेश क्षमता ४०), मशिनिस्ट ग्राइंडर (प्रवेश क्षमता २०), वायरमन (प्रवेश क्षमता २०), आयसीटीएसएम (प्रवेश क्षमता २४), एमएमटीएम (प्रवेश क्षमता २४), इत्यादी व्यवसाय असून यामध्ये वायरमन या व्यवसाय अभ्यासक्रमाकरिता शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण/अनुउत्तीर्ण अशी आहे. इतर दोन वर्षे कालावधीच्या अभ्यासक्रमांकरिता शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण अशी आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:36 18-05-2026