Mumbai Rains: मुंबई उपनगरांमध्ये मान्सून पूर्व पावसाला सुरूवात..

गेल्या दोन दिवसांपासून मुंबई आणि उपनगरातील हवामान बदलत असून, शुक्रवारी सकाळी अनेक भागात पावसाच्या सरी बरसल्या. मान्सून मुंबईत दाखल होण्यास अजून विलंब असला, तरी मान्सून पूर्व सरींनी मुंबईकरांची उकाड्यातून काहीशी सुटका केली.

मुंबई उपनगरातील भांडूप, मुलुंड, कार्जूरमार्ग या भागांमध्ये सकाळी पावसाला सुरूवात झाली. अनेक भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. तर मुंबई महानगर प्रदेशातही सकाळपासूनच आभाळ भरून आल्याने उन्हाच्या झळा कमी झाल्या आहेत.

मुंबई उपनगरांमध्ये मागील तीन-चार दिवसांपासून आकाशात ढगांची गर्दी होत आहे. हवामान विभागाने मुंबईत मान्सून पूर्व पाऊस पडणार असल्याची शक्यता आधीच वर्तवली होती.

Happy journey marathi

मुंबईसह ठाणे, नवी मुंबईत पावसाचा अंदाज

पुढील दोन दिवसात मुंबई, नवी मुंबई, ठाण्यामध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकटासह आणि वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

कोकण, पश्चिम महाराष्ट्रातही वादळी पावसाची शक्यता

आजपासून (२२ मे) पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रात मान्सून पूर्व पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांत काही ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:20 22-05-2026