रत्नागिरी : शेतकऱ्यांच्या जमिनींना संबंधित जमीनमालकाचा आधार क्रमांक जोडण्याची योजना शासनाने हाती घेतली आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या नावावर किती जमीन आहे, ती कोणत्या गावात आहे याची एकत्रित माहिती हाती येणार आहे.
शेतकऱ्यांच्या जमिनी आधार क्रमांकाशी संलग्न करण्याचेही काम हाती घेण्यात येणार आहे. कापूस व सोयाबिनची लागवड केलेल्या शेतकऱ्यांना देय मदत केवळ आधार जोडणी झाल्याची खात्री करून वितरित करण्यात येत होती. मदतीसाठी आधार जोडणी अनिवार्य करण्यात आली. आधार क्रमांक जोडलेली शेतीची माहिती नमो किसान सन्मान योजनेच्या ई-केवायसी पोर्टलला जोडण्यात येत आहे. त्यामुळे या योजनेत एका शेतकऱ्याला एकापेक्षा अधिक जिल्ह्यांत सन्मान योजनेचा लाभ मिळतो आहे का, याची तपासणी केली जाऊ शकते. शेती, त्यातील पिके आदींची माहिती सरकारकडे जमा होणार आहे. शेतीला आधार क्रमांक संलग्न करावे लागणार आहेत. त्यानंतर देय मदत वितरित करणे शक्य होईल, अशी माहिती कृषिखात्याचे विस्तार संचालक विनयकुमार अवटे यांनी दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:27 02-11-2024