रत्नागिरी : आरवली (ता. संगमेश्वर) येथे ब्राह्मणवाडीतील श्री देव आदित्यनारायण मंदिरात पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने कीर्तनसंध्या होणार आहे. बुधवारी, दि. २७ रोजी सायंकाळी ५ वाजता मंदिरात हे कीर्तन होणार आहे.
कीर्तनकार हभप सौ. सायली दामले कीर्तन करणार आहेत. त्यांना हार्मोनियमची साथ पराग लघाटे तर तबलासाथ सूरज पाटणकर करणार आहेत.
कीर्तन सुरू होण्यापूर्वी सामूहिक विष्णुसहस्रनाम पठण होणार आहे. कीर्तनसंध्याचे आयोजन जयवंत परांजपे आणि परिवाराने केले आहे. कीर्तनसंध्येला व सामूहिक विष्णूसहस्रनाम पठणाला उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:57 27-05-2026













