खेड : एकीकडे महावितरणकडून शहरासह ग्रामीण भागात वीजेचा लपंडाव सुरू असताना दुसरीकडे ग्राहकांना वीजबिले उशिराने देवून नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. ऑक्टोबर महिन्यातील वीजबिल ग्राहकांना उशिरानेच देण्यात आली. यामुळे अतिरिक्त भार आकारण्यात आला. सतत खंडित होणार्या वीजपुरवठ्यामुळे ग्राहक मेटाकुटीस आलेले असताना त्यात आता नव्या समस्येची भर पडली आहे. ऑक्टोबर अखेर व नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात भरली जाणारी ऑक्टोबर महिन्याची विजबिले महावितरणच्या संबंधित ठेकेदाराकडून त्या त्या ग्राहकांना उशिराने वितरित करण्यात आली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:55 PM 04/Nov/2024