Corporate Jihad Program Ratnagiri: ‘लव्ह जिहाद’ आता कॉर्पोरेट क्षेत्रात; उद्या रत्नागिरीत हिंदु जनजागृती समितीच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन

रत्नागिरी : रत्नागिरी – चिपळूण, लांजा तालुक्यांतील ग्रामीण भागांपासून ते शहरे – महानगरे यांपर्यंत दिसणारा ‘लव्ह जिहाद’ आता हायटेक होऊन आयटी कंपन्या आणि राष्ट्रीयीकृत बँकांसारख्या उच्चभ्रू कॉर्पोरेट क्षेत्रात पोहोचला आहे.

नाशिकमधील ‘TCS’ कंपनी, मुंबईतील ‘SBI’ बँक आणि पुण्याच्या ‘Wipro’ कंपनीत नुकतेच उघडकीस आलेले हिंदू महिलांचे धार्मिक छळ आणि बळजबरीने धर्मांतराचे प्रयत्न हे एका मोठ्या देशव्यापी संकटाचे संकेत आहेत. या ‘कॉर्पोरेट जिहाद’चे नेमके सत्य काय? हे समाजासमोर आणण्यासाठी रविवार, १४ जून २०२६ रोजी, दुपारी ४ ते सायं. ६:३० या वेळेत ‘जयेश मंगल पार्क’, थिबा पॅलेस रोड, माळनाका, रत्नागिरी येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. गोविंद भारद्वाज यांनी दिली.

​’लव्ह जिहाद’चे नवे हायटेक स्वरूप आणि भीषणता याविषयी हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे म्हणाले की, संस्थात्मक छळ (Institutional Pressure) हा केवळ वैयक्तिक प्रेमाचा विषय नसून, बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये उच्च पदांवर बसलेल्या विशिष्ट मानसिकतेच्या अधिकाऱ्यांकडून आणि मुस्लिम महिला सहकाऱ्यांकडून हिंदू महिलांवर इस्लाम स्वीकारण्यासाठी, नोकरीवरून काढण्याची धमकी देऊन पद्धतशीरपणे मानसिक दबाव आणला जात आहे. ​सध्या समोर आलेली काही प्रकरणे ही केवळ हिमनगाचे टोक असून, कॉर्पोरेट क्षेत्रातील हिंदू महिलांच्या सुरक्षेचा आणि कंपन्यांच्या अंतर्गत व्यवस्थापनाचा प्रश्न यामुळे ऐरणीवर आला आहे.

या देशव्यापी षड्यंत्राचे बिंग फोडण्यासाठी आणि नोकरदार भगिनींच्या रक्षणासाठी या विशेष संवादात
श्री. रमेश शिंदे (राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती), सद्गुरु स्वाती खाडये (सनातन संस्था), अधिवक्त्या प्रीती राऊत (हिंदुत्ववादी कार्यकर्त्या) हे मुख्य वक्ते अनेक धक्कादायक बाबी उघड करणार आहेत.

​हा विषय संपूर्ण हिंदू समाजाच्या सुरक्षिततेशी जोडलेला असल्याने रत्नागिरीतील सर्व नागरिक, महिला आणि युवकांनी या संवादाला अवश्य उपस्थित राहावे, असे आवाहन समितीने केले आहे. अन्यायग्रस्त महिलांनी मदतीसाठी ७७३८२३३३३३ या क्रमांकावर संपर्क साधावा.

या पत्रकार परिषदेला भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ. वर्षा ढेकणे, उपजिल्हाध्यक्ष श्री. संदीप नाचणकर, शहराध्यक्ष श्री. परशुराम तथा दादा ढेकणे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष श्री. गणेश गायकवाड, श्री हनुमान मंदिर, कोकण नगरचे विश्वस्त श्री. किशोर भुते उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:00 13-06-2026