रत्नागिरी : रविवार, दिनांक २१ जून २०२६ रोजी खंडाळा येथील BODY GARAGE THE GYM या अत्याधुनिक व्यायामशाळेचा उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या नव्या जिमचे संचालक श्री. शक्तिराज धुंदूर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या फिटनेस सेंटरचे उद्घाटन IFBB राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य व बिल्डिंग व्यावसायिक श्री. वीरेंद्र वणजू यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी जिमचे मालक श्री. शक्तिराज धुंदूर व त्यांचे परिवार, सौ. योगिता वणजू ,ज्येष्ठ उद्योजक श्री. प्रमोद घाटगे, कोच अखिलेश वायंगणकर, युवा उद्योजक कु. पार्थ पाटील, डॉ. जोग, संकेत पारकर, ऋषिराज धुंदूर, यश सुर्वे, पराग मोहिते, साईराज धुंदूर, साळवी, संकेत काताळे, परेश माने, राहुल पारकर, किरण जाधव, आशिष कांबळे, ओम घाटगे, सचिन भोपळे तसेच अन्य मान्यवर व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी शरीरसौष्ठव क्षेत्रात तब्बल ३० ते ३५ वर्षे कार्यरत असलेले श्री. वीरेंद्र वणजू यांनी उपस्थित युवकांना मोलाचे मार्गदर्शन केले. आजच्या धकाधकीच्या जीवनात निरोगी व सुदृढ शरीर हीच खरी संपत्ती असून, नियमित व्यायाम, योग्य आहार आणि शिस्तबद्ध जीवनशैली यांचा अंगीकार करणे काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. शरीराची योग्य जडणघडण करून युवकांनी व्यसनांपासून दूर राहून आरोग्यदायी जीवनशैलीचा स्वीकार करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
“आपलं शरीर सुदृढ ठेवण्यासाठी व्यायामाची कास धरणं ही काळाची गरज असून, निरोगी समाजाच्या निर्मितीसाठी प्रत्येकाने नियमित व्यायामाला आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवायला हवे,” असा संदेश या उद्घाटन सोहळ्यातून देण्यात आला.
नवीन अत्याधुनिक उपकरणे, प्रशिक्षित मार्गदर्शन आणि शरीरसौष्ठव स्पर्धांसाठी आवश्यक प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणारे BODY GARAGE THE GYM हे फिटनेसप्रेमींसाठी एक नवे प्रेरणास्थान ठरणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:18 22-06-2026














