पावस : रत्नागिरी तालुक्यातील राधा पुरुषोत्तम पटवर्धन माध्यमिक विद्यालय, कुर्धे येथे पणती पेंटिंग वर्कशॉप घेण्यात आले. दीपावलीचा सण जवळ आला आहे. त्यासाठी शाळेमध्ये या वर्षी शाळेच्या मुख्याध्यापकांच्या कल्पनेतून हा वेगळा उपक्रम घेण्यात आला. त्यासाठी आनंददायी शनिवार निवडण्यात आला. यानिमित्त शाळेत टेक्निकल विषय अंतर्गत दरवर्षी गणपती – दिवाळी सणांच्या निमित्ताने मुलांना उदबत्ती, सेंट, मेणाच्या पणत्या, उटणे अशा विविध वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाते. मुलांना कृतीतून शिक्षण मिळावे, नननिर्मितीचा आनंद मिळावा हा त्या वर्कशॉपचा हेतू आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:52 PM 24/Sep/2024