चिपळूण:
Chiplun Car Accident | चिपळूण तालुक्यातून अपघाताची एक थरारक पण सुदैवाने जीवितहानी टळलेली घटना समोर आली आहे. चिपळूण-कराड मार्गावरील शिवनदी येथे एक कारचालक आपली कार रिव्हर्स घेत असताना त्याचा गाडीवरील ताबा अचानक सुटला. नियंत्रण सुटल्यामुळे ही कार थेट शिवनदीच्या पात्रात कोसळली. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
पावसाचा जोर कमी असल्याने टळले मोठे संकट
सुदैवाने गेल्या दोन दिवसांपासून परिसरात पावसाचा जोर कमी होता, ज्यामुळे नदीच्या पात्रातील पाण्याचा प्रवाह मर्यादित होता आणि एक मोठा अनर्थ टळला. जर शिवनदीला पूर आला असता किंवा मोठे पाणी असते, तर कदाचित या ठिकाणी खूप मोठा आणि गंभीर अपघात घडला असता, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
क्रेनच्या साहाय्याने कार काढली बाहेर; चालक सुरक्षित
अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी क्रेन पाचारण करण्यात आली. क्रेनच्या सहाय्याने नदीपात्रात कोसळलेली कार यशस्वीपणे बाहेर काढण्यात आली. या अपघातात कारचे किरकोळ नुकसान झाले असून, सुदैवाने कारचालक यातून पूर्णपणे सुरक्षित बचावला आहे. दरम्यान, हा अपघात पाहण्यासाठी स्थानिक नागरिक आणि रस्त्यावरून जाणाऱ्या बघ्यांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:34 10-07-2026














