संगमेश्वर पोलिसांकडे १३२ बंदुका जमा

संगमेश्वर : विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर होताच जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील या बंदूकधाऱ्यांना त्यांच्याकडील शस्त्र जिल्हा प्रशासनाच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून पोलिस विभागाकडे जमा करण्यास सुरवात झाली आहे.

संगमेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील १३२ बंदुका संगमेश्वर पोलिस ठाण्यात जमा करण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यातील अनेकांकडे शस्त्र परवाना असून, ज्यांच्याकडे बंदुकाही आहेत त्यांना बंदुका जमा करण्यात सुरवात केली आहे. संगमेश्वर पोलिस ठाण्यांतर्गत नाक्यानाक्यांत वाहनांची तपासणी करण्यात येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:44 06-11-2024

Khabardar diwali fest