पंतप्रधान नरेंद्र मोदींची इन्स्टाग्राम पोस्टद्वारे प्रतिक्रिया; सोनम वांगचुक यांच्या उत्तम आरोग्यासाठी व्यक्त केली प्रार्थना
नवी दिल्ली: Sonam Wangchuk Ends Hunger Strike (सोनम वांगचुक उपोषण मागे) संदर्भातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राजधानी दिल्लीत गेल्या २५ दिवसांपेक्षा जास्त कालावधीपासून सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांचे उपोषण सुरू होते. अखेर २६ व्या दिवशी केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा आणि केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांची भेट घेतल्यानंतर सोनम वांगचुक यांनी आपले उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
नीट पेपरफुटी आणि केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी नीट पेपरफुटीप्रकरणात (NEET Paper Leak Case) जबाबदारी स्वीकारत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मुख्य मागणी सोनम वांगचुक यांच्यासह कॉक्रोच जनता पक्षाचे (CJP) अभिजीत दीपके यांनी केली होती. जंतर-मंतर येथे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वांगचुक यांनी २८ जून रोजी उपोषण सुरू केले होते. दरम्यान, आंदोलनादरम्यान झालेल्या पोलीस मारहाणीनंतर देशभरातून तीव्र रोष व्यक्त केला जात होता.
शासनाचे आश्वासन अन् कायदा आणण्याची घोषणा आंदोलनाची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पेपरफुटी रोखण्यासाठी कडक कायदा आणणार असून यामध्ये फास्ट ट्रॅक कोर्ट आणि कठोर शिक्षेची तरतूद केली जाईल, अशी माहिती दिली. सरकारच्या वतीने मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर वांगचुक यांनी उपोषण मागे घेण्याचे जाहीर केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहून प्रतिक्रिया दिली. “मी सोनमजींना आवाहन करतो की, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपली दैनंदिन दिनचर्या सुरू ठेवावी आणि लवकरात लवकर आपले पूर्वीचे वजन पुन्हा मिळवावे. सोनमजी निरोगी राहोत, अशी मी देवाकडे प्रार्थना करतो,” असे पंतप्रधान मोदींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
रुग्णालयातील उपचार अन् उपोषणाची सांगता उपोषणादरम्यान प्रकृती खालावल्यामुळे सोनम वांगचुक यांना सुरुवातीला सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना पुढील उपचारासाठी मेदांता रुग्णालयात हलवण्यात आले, जिथे केंद्रीय मंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर उपोषणाची यशस्वी सांगता झाली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:25 24-07-2026













