जंतर-मंतरवर आंदोलकांचा जल्लोष; सरकारवर निशाणा साधत Dharmendra Pradhan Resigns मुद्द्यावर कॉक्रोच जनता पार्टीची आक्रमक भूमिका
Dharmendra Pradhan Resigns: नीट पेपरफुटी प्रकरणावरून (NEET Paper Leak) सलग ३५ दिवस चाललेल्या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यानंतर दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन करणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके यांनी आपली पहिली आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. “आम्ही सर्वांनी मिळून हे करून दाखवले,” असे उद्गार त्यांनी उपस्थित हजारो आंदोलकांसमोर काढले.
Dharmendra Pradhan Resigns: “या सरकारमध्ये राजीनामे होत नाहीत म्हणणाऱ्यांना उत्तर”
जंतर-मंतर येथील व्यासपीठावरून बोलताना अभिजीत दीपके यांनी केंद्र सरकारवर थेट निशाणा साधला. ते म्हणाले, “हे लोक काय म्हणायचे? ‘या सरकारमध्ये राजीनामे होत नाहीत!’ (इस सरकार में इस्तिफे नही होते). पण आज देशातील तरुणांच्या, विद्यार्थ्यांच्या आणि सामान्य नागरिकांच्या एकजुटीने हे सिद्ध करून दाखवले आहे की, सत्याचा आणि संघर्षाचाच विजय होतो.”
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामुळे ३५ दिवसांपासून सुरू असलेल्या या ऐतिहासिक विद्यार्थी आंदोलनाला अखेर मोठे यश मिळाले असून जंतर-मंतर परिसरात आंदोलकांनी मोठा जल्लोष केला.
देशव्यापी आंदोलनापुढे सरकार नमले
गेल्या महिन्याभरापासून नीट पेपरफुटीविरोधात जंतर-मंतरवर सुरू असलेल्या या आंदोलनाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत होती. दिल्लीतील आंदोलनाचे लोण मुंबई, राजस्थान, बिहार आणि गुवाहाटीपर्यंत पोहोचले होते.
बिहारमधील जाळपोळ आणि जंतर-मंतरवरील पोलीस कारवाईनंतर विद्यार्थ्यांमधील असंतोष अधिकच वाढला होता. अखेर वाढता राजकीय दबाव आणि देशव्यापी आक्रोश लक्षात घेता, केंद्र सरकारला केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा स्वीकारणे भाग पडले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:54 25-07-2026














