शृंगारतळी येथे महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघटनेचा जिल्हा मेळावा संपन्न

गुहागर : महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने नुकताच रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा भव्य जिल्हा मेळावा गुहागर तालुक्यातील मौजे शृंगारतळी येथील भवानी सभागृह शृंगारतळी येथे आयोजित करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे राज्य संगठन सचिव कॉम्रेड मंगेशजी म्हात्रे, राज्य सहसचिव कॉम्रेड अॅडव्होकेट राहुल जाधव, राज्य कार्यकारिणीचे सदस्य कॉम्रेड गोविंद म्हात्रे,राज्य कार्यकारिणी सदस्य कॉम्रेड यलाप्पा कोळी, सांगली जिल्ह्यातील कॉम्रेड महंतेश महपती आणि कॉम्रेड श्रीकांत गुरव, तसेच रायगड जिल्ह्यातील कॉम्रेड नरेश काळेकर व कॉम्रेड विजय सत्वे हे विशेष उपस्थित होते.

या मेळाव्याला रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे 350 ते 400 ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या उत्साहात उपस्थित होते. मेळाव्याचा उद्देश संघटनेचे संघटन बळकट करणे, कर्मचारी प्रश्नांचा आढावा घेणे आणि संघटनेची जिल्हा कार्यकारिणी पुनर्स्थापित करणे हा होता. राज्य पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कार्यकारिणीची फेरनिवड प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली.नवीन जिल्हा कार्यकारिणीची निवड करताना खेड तालुक्याचे कॉम्रेड हरिश्चंद्र बाचीम यांची जिल्हाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. सचिवपदी चिपळूण तालुक्याचे कॉम्रेड संजय खताते, सहसचिवपदी गुहागर तालुक्याचे कॉम्रेड सुदेश हडकर यांची निवड झाली. संघटनेच्या उपाध्यक्षपदी दापोली तालुक्याचे कॉम्रेड अनंत पद्याल, गुहागरचे कॉम्रेड राजेश घाणेकर, आणि राजापूरचे कॉम्रेड संदीप हरयाण यांची नेमणूक करण्यात आली. तसचे संघटनेच्या खजिनदारपदी रत्नागिरी तालुक्याचे कॉम्रेड वैभव सुपल यांची नेमणूक करण्यात आली.

या निवड प्रक्रियेनंतर मान्यवरांच्या मार्गदर्शनाचे सत्र पार पडले. यामध्ये संघटनेच्या भविष्यातील वाटचालीसाठी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी संघटन अधिक बळकट करण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले. कर्मचारी वर्गाच्या हक्कांसाठी अधिक जोमाने काम करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:45 24-09-2024