चिपळूण : महायुती सरकारने नवीन पर्यटन धोरण विधेयक मंजूर केले आहे. त्याचा सर्वात जास्त फायदा कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला होणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांना दिली.
कोल्हापूर, सांगलीच्या धर्तीवर चिपळूण पूरमुक्त योजना राबविणार असून त्यासाठी दोन हजार कोटीचा निधी देऊ, असे त्यांनी सांगितले.
नवीन टुरिझम धोरणावर उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, निसगनि कोकणवर फार उधळण केलेली आहे. त्याचाच फायदा पर्यटन आणि उद्योग-व्यवसाय वाढवायला व्हायला पाहिजे. राज्यभरातील अनेक लोक येथे आता पर्यटनाला येत आहेत. त्यात अधिक वाढ व्हायला हवी. त्यातून मोठी रोजगारवाढ होईल. हॉटेल्स, चांगले जेवण, चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी नवीन टूरिझम धोरण शासनाने आखले आहे.
पूरमुक्तीसाठी आराखडा मंजूर करू. चिपळूणच्या पूरमुक्तीसाठी कोल्हापूर, सांगलीच्या धर्तीवर दोन हजार कोटींचा आराखडा आम्ही तयार करतो. त्याचा पाठपुरावा आमदार शेखर निकम करीत आहेत. त्यामुळे तो आगामी काळात मंजूर करण्याचा शब्द देतो.
आपण देखील विरोधी पक्षनेतेपद भूषविले आहे. त्यामुळे विरोधक विरोधात बोलणारच. मात्र सर्वसामान्य जनतेचा फायदा व्हायला हवा हे सत्ताधाऱ्यांचे काम आहे आणि तोच ध्यास आम्ही घेतला आहे. महायुतीमध्ये कोण उमेदवार द्यायचा ते आम्ही ठरवू. आम्ही घड्याळाचाच उमेदवार देणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:45 24-09-2024