नवउद्योजकांना स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी आर्थिक बळ; ५० लाखांपर्यंतच्या कर्ज मर्यादांसाठी जिल्हा व्यवस्थापक आर. एस. नरवडे यांचे आवाहन
रत्नागिरी / प्रतिनिधी: विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि इतर मागास प्रवर्गातील (ओबीसी) नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळातर्फे विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत. VJNT Loan Scheme Ratnagiri अंतर्गत जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक आर. एस. नरवडे यांनी केले आहे. जिल्ह्यातील तरुण आणि होतकरू उद्योजकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी व त्याचा विस्तार करण्यासाठी या योजना अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत.
विविध कर्ज योजना आणि मर्यादा
महामंडळातर्फे आर्थिक गरजेनुसार वेगवेगळ्या स्वरूपातील कर्ज योजनांची रचना करण्यात आली आहे. उपलब्ध असलेल्या प्रमुख योजना खालीलप्रमाणे आहेत:
- थेट कर्ज योजना: रु. १ लाखांपर्यंतचे कर्ज.
- बीज भांडवल कर्ज योजना: व्यवसायासाठी २५ टक्के बीज भांडवल.
- वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना: रु. १० लाखांपर्यंतची कर्ज मर्यादा.
- गट कर्ज व्याज परतावा योजना: रु. १० लाख ते जास्तीत जास्त रु. ५० लाखांपर्यंतची कर्ज मर्यादा.
अर्ज कसा करावा? कार्यालयाचा पत्ता व संपर्क
या योजनांचा लाभ घेण्यासाठी आणि अटी व शर्तींची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी इच्छुकांनी डॉ. बाबासाहेब सामाजिक न्याय भवन, ५ वा मजला, पाटबंधारे स्टॉप, कुवारबाव, जिल्हा रत्नागिरी – ४१५६३९ या कार्यालयाच्या पत्त्यावर प्रत्यक्ष संपर्क साधावा.
तसेच अधिक माहितीसाठी ०२३५२-२३००६३ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा ९९२३१९२४१४ (राहुल सुखदेव नरवडे) या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधता येईल. नागरिक vjntratnagiri@gmail.com या ई-मेल आयडीवर अथवा महामंडळाच्या अधिकृत वेबसाईट VJNT Official Website ला भेट देऊन अधिक तपशील मिळवू शकतात. जिल्ह्यातील पात्र तरुण-तरुणींनी या संधीचा फायदा घेऊन स्वतःचे उद्योग उभारण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:15 05-08-2026














