Mandangad Police Action: मद्य प्राशन करून नागरिकांना त्रास देणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

तरुणांचा इमारतीच्या छतावरून हुल्लडबाजीचा प्रकार; महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये कारवाई

रत्नागिरी/मंडणगड:

Mandangad Police Action अंतर्गत मंडणगड तालुक्यातील आदर्शनगर येथे मद्य प्राशन करून इमारतीच्या छतावरून आसपासच्या नागरिकांना उपद्रव करणाऱ्या दोन तरुणांवर मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी, ४ ऑगस्ट रोजी रात्री १२:३० वाजेच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली.

पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, अभी राकेश शिंदे (वय २०) आणि सोहम सुनील टेंमकर (वय २१, दोघेही रा. दिवा ईस्ट, ठाणे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. हे दोघेही संशयित मंडणगड येथील आदर्शनगर भागातील एका इमारतीत राहत होते. मंगळवारी मध्यरात्री हे दोघे इमारतीच्या छतावर दारूच्या नशेत आजूबाजूच्या रहिवाशांना त्रास देण्याचा प्रकार करत होते.

या प्रकरणी पोलीस शिपाई अमित भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली. पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आणि दोन्ही संशयितांवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास मंडणगड पोलीस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:57 06-08-2026