‘जात पडताळणी समिती अर्ध-न्यायिक प्राधिकरण; कोणताही मंत्री फोन करू शकत नाही’ – चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्पष्टीकरण
नागपूर / मुंबई:
Chandrashekhar Bawankule Narco Test Challenge प्रकरणात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अत्यंत आक्रमक आणि स्पष्ट भूमिका घेतली आहे. “माझी नार्को टेस्ट करायची असेल तर त्याला माझी पूर्ण परवानगी आहे. जात पडताळणी विभाग ही एक अर्ध-न्यायिक (Semi-Judicial) संस्था आहे; त्यात कोणताही मंत्री किंवा राजकीय नेता हस्तक्षेप करू शकत नाही,” असे म्हणत बावनकुळे यांनी जरांगे पाटलांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथील पत्रकार परिषदेत बावनकुळे यांच्यावर कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यासाठी फोन केल्याचा आणि आर्थिक गैरव्यवहाराचा गंभीर आरोप केला होता. यावर पहिली मोठी प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले, “जात पडताळणी समितीच्या न्यायिक अधिकारात कोणालाही हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. कोणताही मंत्री या ऑथोरिटीला फोन करू शकत नाही आणि समिती कोणाचे ऐकेल असे कोणत्याही राज्यात घडत नाही. जरांगे पाटील नक्की कोणत्या आधारावर बोलले हे मला माहीत नाही.”
कुणबी प्रमाणपत्रे रद्द होण्याच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “प्रमाणपत्रे का रद्द होत आहेत, याचे स्पष्टीकरण केवळ जात पडताळणी समितीच देऊ शकते. याचा सर्व डेटा अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असतो, जिथे कोणाची पडताळणी झाली हे पाहता येते. जर कोणावर अन्याय झाला असे वाटत असेल, तर हायकोर्टात जाऊन अपील करण्याचा आणि निर्णयावर स्थगिती (Stay) आणण्याचा मार्ग खुला आहे.”
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही जरांगे यांनी केलेल्या आरोपांबाबत विचारले असता, “जरांगे नक्की काय बोलले हे मी स्वतः ऐकलेले नाही, त्यामुळे त्यावर अधिक भाष्य करणार नाही,” असे बावनकुळे यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:25 06-08-2026














