Journalism Course Admission 2026: मुक्त विद्यापीठाच्या पत्रकारिता पदविका अभ्यासक्रमाच्या ऑनलाईन प्रवेशाची ३० ऑगस्टपर्यंत मुदत

वायसीएमओयू आणि पत्रकार ग. गो. जाधव चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम; १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी प्रिंट, इलेक्ट्रॉनिक मीडिया अन् जनसंपर्कात करिअरची संधी

Journalism Course Admission 2026 अंतर्गत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (YCMOU), नाशिक संचालित २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. मुक्त विद्यापीठाच्या पत्रकारितेतील ‘जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या पदविका’ (कोड क्र. P03) या एक वर्षाच्या डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३० ऑगस्टपर्यंत आहे. पत्रकार ग. गो. जाधव चॅरिटेबल ट्रस्टद्वारे (७५१७ ए) गेल्या २२ वर्षांपासून हा अभ्यासक्रम यशस्वीरीत्या आयोजित केला जात आहे.

या अभ्यासक्रमासाठी १२ वी उत्तीर्ण अथवा समकक्ष शासनमान्य परीक्षा उत्तीर्ण असलेले विद्यार्थी प्रवेश घेण्यास पात्र आहेत. हा अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया तसेच जनसंपर्क अधिकारी (PRO) यांसारख्या विविध क्षेत्रांत करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होतात. याशिवाय स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही हा अभ्यासक्रम अत्यंत उपयुक्त ठरत असून, पत्रकारिता क्षेत्राशी संबंधित शाखेमध्ये याद्वारे प्राविण्य मिळवता येते.

Journalism Course Admission 2026: नियमित शिक्षणासोबत प्रवेशाची संधी; ‘या’ संकेतस्थळावर करा ऑनलाईन अर्ज
ज्या विद्यार्थ्यांनी आधीच इतर कोणत्याही पदवी किंवा नियमित अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेला आहे, त्यांनाही त्यांच्या नियमित शिक्षणाच्या जोडीला या पत्रकारिता पदविकेला प्रवेश घेता येणार आहे. प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया https://ycmou.digitaluniversity.ac या अधिकृत संकेतस्थळावर सुरू करण्यात आली आहे.

प्रवेशाबाबत अधिक माहितीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी दैनिक ‘पुढारी’ कार्यालयात सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत (०२३१-२५४३९११, १२, १३, १४) या क्रमांकांवर संपर्क साधावा. या सुवर्णसंधीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अभ्यास केंद्रातर्फे करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:47 15-08-2026