Ratnagiri Public Drinking Case: रत्नागिरीत सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या ६ जणांवर पोलीस कारवाई; शहर व ग्रामीण पोलिसांत गुन्हे दाखल

प्रमोद महाजन क्रीडा संकुल, भाटये बीच आणि निवळी परिसर पोलीस कारवाईची केंद्रबिंदू; पोलिसांकडून धडक मोहीम

Ratnagiri Public Drinking Case News अंतर्गत रत्नागिरी शहर आणि ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या ६ जणांवर पोलिसांनी कायदेशीर कारवाई करत गुन्हे दाखल केले आहेत. ही धडक कारवाई गुरुवारी (१३ ऑगस्ट) दुपारी ते रात्रीच्या दरम्यान विविध ठिकाणी करण्यात आली.

रत्नागिरी शहरातील प्रमोद महाजन क्रीडा संकुल, पालिकेची बंद शाळा, भाटये बीच तसेच ग्रामीण भागातील निवळी पेट्रोल पंप आणि खरवते या सार्वजनिक ठिकाणी काही नागरिक मद्यपान करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

Ratnagiri Public Drinking Case News: पोलीस पथकांकडून कारवाई; संशयितांची नावे समोर

सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन हुल्लडबाजी आणि शांततेचा भंग करणाऱ्यांवर पोलिसांनी तातडीने कठोर कारवाई केली. या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आणि गुन्हे दाखल केलेल्या ६ संशयितांची नावे खालीलप्रमाणे आहेत:

  • अमित सुभाष मालगुंडकर (वय ३३, रा. मुरुगवाडा, रत्नागिरी)
  • राकेश जगन्नाथ लाड (वय ५०, रा. झारणी रोड, रत्नागिरी)
  • अशोक श्रीपत शिंदे (वय ५५, रा. निवळी शिंदेवाडी, रत्नागिरी)
  • राजेंद्र संभाजी मालप (वय ४२, रा. निवळी मालपवाडी, रत्नागिरी)
  • चंद्रकांत शंकर पिलणकर (वय ५६, रा. सनगरेवाडी, कोतवडे, रत्नागिरी)
  • प्रतिक सुरेश सिंग (वय २६, रा. सिद्धिविनायकनगर, शिवाजीनगर, रत्नागिरी)

या कारवाईत पोलीस हेड कॉन्स्टेबल अनुप पाटील, राकेश बागुल, पोलीस कॉन्स्टेबल बाळू गिते, पोलीस हेड कॉन्स्टेबल रुपेश भिसे, प्रदिप पाटील आणि पोलीस हवालदार प्रमोद कांबळे यांनी शहर व ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्या आहेत. त्या तक्रारींच्या आधारे पोलिसांनी सर्व संशयितांवर विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:30 15-08-2026