ब्रेकिंग: BJP New National Team 2026: भाजपकडून नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर! विनोद तावडेंचे सरचिटणीसपद कायम; स्मृती इराणी आणि वसुंधरा राजे यांना मोठी जबाबदारी

महाराष्ट्रातून डॉ. भारती पवार उपाध्यक्ष तर पियूष गोयल कोषाध्यक्ष; उत्तर प्रदेश, राजस्थानसह प्रादेशिक समीकरणांवर भर

नवी दिल्ली:

Nitin Nabin BJP New National Team 2026 अंतर्गत आगामी लोकसभा आणि उत्तर प्रदेशसह विविध राज्यांच्या आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी आपली नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे. या नव्या चमूमध्ये आगामी राज्य विधानसभा निवडणुका, प्रादेशिक समतोल, युवा व महिला नेतृत्व आणि जातीय समीकरणांची योग्य सांगड घालत अनेक महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातून खासदार विनोद तावडे यांच्याकडे राष्ट्रीय सरचिटणीस (महामंत्री) पदाची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील नेत्यांना मिळालेली प्रमुख पदे

भाजपच्या नव्या संघटनाव्यचनेत महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे:

  • विनोद तावडे: राष्ट्रीय महामंत्री (सरचिटणीस) पदी कायम.
  • डॉ. भारती प्रवीण पवार: राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती.
  • पियूष गोयल: राष्ट्रीय कोषाध्यक्षपदाची नवीन जबाबदारी.
  • प्रीती गांधी: सोशल मीडिया सह-संयोजकपदी निवड.

देशभरातील प्रमुख नेत्यांचा समावेश (Nitin Nabin New Team)

पक्षाच्या नव्या कार्यकारिणीत देशभरातील दिग्गज नेत्यांना महत्त्वाच्या भूमिका देण्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर राजकारणातून काहीशा बाजूला पडलेल्या स्मृती इराणी यांना पक्षात पुन्हा मोठी जबाबदारी मिळाली आहे:

  • स्मृती इराणी (उत्तर प्रदेश): राष्ट्रीय महामंत्रीपदी निवड.
  • वसुंधरा राजे सिंधिया (राजस्थान): राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती.
  • बी. एल. संतोष (दिल्ली): राष्ट्रीय महामंत्री (संघटन) पदी कायम.
  • राजेश मंगल (राजस्थान): राष्ट्रीय सह-कोषाध्यक्ष.
  • दीपक मस्के: सोशल मीडिया संयोजक (अमित मालवीय यांच्या जागी निवड).

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीवर विशेष भर

भाजपच्या या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीत १३ उपाध्यक्ष, ८ राष्ट्रीय महामंत्री आणि १६ राष्ट्रीय मंत्री यांचा समावेश आहे. यामध्ये एकट्या उत्तर प्रदेशातून तब्बल ८ नेत्यांना संधी देण्यात आली आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीला होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही रचना अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या नव्या नियुक्तींमुळे पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळकटी मिळेल, असा विश्वास भाजप नेतृत्वाने व्यक्त केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:13 17-08-2026