Ratnagiri Rainfall News: रत्नागिरी जिल्ह्यात २४ तासांत १७४.६० मिमी पाऊस; चिपळूणमध्ये सर्वाधिक तर लांजात सर्वात कमी नोंद

श्रावणात पावसाची संततधार सुरूच; भात आणि नागलीच्या पिकांना समाधानकारक पावसाची मिळाली साथ

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात मागील २४ तासांत एकूण १७४.६० मिमी पावसाची नोंद झाली आहे. सध्या पावसाचा जोर काहीसा ओसरला असून दिवसभर अधूनमधून संततधार पाऊस सुरू होता. काही काळ ढगाळ वातावरण तर काही वेळ उन्हाचे दर्शन, असे संमिश्र वातावरण संपूर्ण जिल्ह्यात पाहायला मिळाले.

चिपळूण तालुक्यात सर्वाधिक २८.५० मिमी तर लांज्यात सर्वात कमी पाऊस

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. त्यानंतर काही तालुक्यांत मुसळधार सरी कोसळल्या. सध्या श्रावण महिन्यात जिल्ह्यात पावसाची संततधार कायम आहे. गेल्या २४ तासांतील आकडेवारीनुसार चिपळूण तालुक्यात सर्वाधिक २८.५० मिमी पावसाची नोंद झाली आहे, तर लांजा तालुक्यात सर्वात कमी म्हणजे ८.९० मिमी इतका पाऊस पडला आहे.

भात आणि नागलीच्या पिकांना नवसंजीवनी

काही दिवसांच्या तुलनेत पावसाचा जोर कमी झाला असला तरी ही संततधार शेतीसाठी उपयुक्त ठरत आहे. वेळेवर आणि योग्य प्रमाणात पडणाऱ्या या पावसामुळे जिल्ह्यातील भात आणि नाचणीची (नागली) पिके उत्तम प्रकारे बहरली असून शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

तालुकानिहाय पावसाची आकडेवारी (मिमीमध्ये)

राजापूर: १२.८० मिमी

मंडणगड: १९.८० मिमी

दापोली: १९.८० मिमी

खेड: २२.३० मिमी

गुहागर: १७.८० मिमी

चिपळूण: २८.५० मिमी

संगमेश्वर: २८.१० मिमी

रत्नागिरी: १६.६० मिमी

लांजा: ८.९० मिमी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:58 18-08-2026