‘गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण’ योजनेअंतर्गत टॉयोटा फॉर्च्युनर आणि दोन इनोव्हा क्रिस्टा गाड्या ताफ्यात
रत्नागिरी:
Ratnagiri District Administration (रत्नागिरी जिल्हा प्रशासन) च्या ताफ्यात ‘गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण’ या विशेष योजनेअंतर्गत तीन नवी वाहने दाखल झाली आहेत. पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते या वाहनांचे जिल्हा प्रशासनाकडे अधिकृत हस्तांतरण व लोकार्पण करण्यात आले.
Ratnagiri District Administration: जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सोहळा
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पार पडलेल्या या लोकार्पण कार्यक्रमाला जिल्हाधिकारी मनुज जिंदल, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, प्रांताधिकारी जीवन देसाई, नगरसेवक बंड्या साळवी आणि जिल्हा परिषद सदस्य बाबू म्हाप आदी मान्यवर व अधिकारी उपस्थित होते.
महसूलमंत्र्यांची विशेष परवानगी अन् तीन नव्या गाड्या दाखल
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विशेष बाब म्हणून रत्नागिरी जिल्हा प्रशासनासाठी नवीन वाहने खरेदी करण्यास परवानगी दिली होती. त्यानुसार प्रशासनाच्या ताफ्यात १ टॉयोटा फॉर्च्युनर (Toyota Fortuner) आणि २ टॉयोटा इनोव्हा क्रिस्टा (Toyota Innova Crysta) अशी एकूण तीन आधुनिक वाहने दाखल झाली आहेत.
आपत्कालीन स्थितीत प्रशासकीय गतिमानता वाढणार
या नवीन वाहनांमुळे जिल्हा प्रशासनाची गतिमानता वाढण्यास मदत होणार आहे. विशेषतः अतिवृष्टी, पूर, दरड कोसळणे यांसारख्या विविध आपत्कालीन परिस्थितींमध्ये प्रशासकीय यंत्रणेला तातडीने घटनास्थळी पोहोचून आवश्यक त्या उपाययोजना करणे अधिक सोपे व प्रभावी ठरणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:59 19-08-2026














