Dapoli: सततच्या आजारपणाला कंटाळून दापोलीत ४० वर्षीय इसमाची आत्महत्या

बौद्धवाडी येथील घटना; बेडरूममध्ये छताला ओढणीच्या साहाय्याने लावून घेतला गळफास

दापोली, रत्नागिरी:

Dapoli Suicide News (दापोली): सततच्या आजारपणाला कंटाळून एका ४० वर्षीय इसमाने राहत्या घरात कोणी नसताना छताला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना दापोलीतील बौद्धवाडी येथे घडली आहे. विश्वजित विश्वनाथ कासारे (वय ४०) असे आत्महत्या केलेल्या मृत व्यक्तीचे नाव आहे. १८ ऑगस्ट रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

Dapoli Suicide News: आजारपणाच्या त्रासातून उचलले टोकाचे पाऊल

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, विश्वजित कासारे हे गेल्या काही काळापासून सतत आजारी असायचे. वारंवार उद्भवणाऱ्या या आजारपणामुळे आणि शारीरिक त्रासाला ते प्रचंड कंटाळले होते.

१८ ऑगस्ट रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घरातील इतर सदस्य बाहेर गेले असताना आणि घरात कोणीही नसताना, त्यांनी बेडरूममधील छताच्या लोखंडी बारला कापडी ओढणीने गळफास लावून घेतला. घरातील व्यक्ती काही वेळेनंतर परत आल्यावर हा प्रकार समोर आला.

दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद

या घटनेची माहिती विश्वजित यांचे मेहुणे प्रवीण जनार्दन तांबे (वय ४८, रा. बौद्धवाडी, मौजे दापोली, ता. दापोली, जि. रत्नागिरी) यांनी तत्काळ दापोली पोलीस ठाण्यात दिली.

प्रवीण तांबे यांनी दिलेल्या खबरीवरून दापोली पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यू (Accidental Death) म्हणून नोंद केली असून, या घटनेचा पुढील तपास दापोली पोलीस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:59 19-08-2026