वाचा मेष ते मीन राशींचे सविस्तर भविष्य
वैदिक ज्योतिषशास्त्र:
Daily Horoscope Today (दैनिक राशीभविष्य): आज १९ ऑगस्ट २०२६, म्हणजेच बुधवारचा दिवस आहे. ज्योतिषशास्त्रानुसार बुधवारचा दिवस हा श्री गणपती बाप्पाला समर्पित मानला जातो. त्यामुळे आज अनेक भाविक गणरायाच्या मंदिरात जाऊन विशेष पूजा-अर्चा करतात.
ग्रहांच्या हालचाली आणि गोचराच्या दृष्टीने आजचा दिवस सर्व १२ राशींसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. लवकरच शनि महाराजांची वक्री चाल सुरू होणार असून, या ग्रहांच्या संक्रमणाचा विविध राशींवर शुभ आणि अशुभ असा दोन्ही प्रकारचा प्रभाव पाहायला मिळणार आहे. पाहूयात आज तुमच्या राशीच्या नशिबात काय लिहिले आहे.
Daily Horoscope Today: मेष ते कर्क राशीचे भविष्य
- मेष रास (Aries):मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस काहीसा चिंतेचा राहण्याची शक्यता आहे. प्रवासादरम्यान अचानक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. उत्पन्नात चढ-उतार राहतील तसेच मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होऊ शकतो. व्यवसायाची स्थिती मध्यम राहील. सभोवतालच्या नकारात्मक गोष्टींचा प्रभाव स्वतःवर पडू देऊ नका.
- वृषभ रास (Taurus):वृषभ राशीच्या व्यापाऱ्यांसाठी आजचा दिवस चढ-उतारांचा असेल. कोर्ट-कचेरीशी संबंधित जुने वाद मिटण्याचे संकेत आहेत. मुलांकडून एखादी आनंदाची बातमी मिळेल. कामातील अडथळे दूर करण्यासाठी लाल रंगाच्या वस्तूंचे दान करणे फायदेशीर ठरेल.
- मिथुन रास (Gemini):मिथुन राशीसाठी दिवस सामान्य राहील. सार्वजनिक जीवनात मान-सन्मानाला ठेच पोहोचणार नाही याची दक्षता घ्या. प्रवासात विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. धार्मिक कार्यात सहभागी होताना विधीपूर्वक कामे करा. अपुऱ्या झोपेमुळे चिडचिड होण्याची शक्यता आहे.
- कर्क रास (Cancer):दिवसाची सुरुवात काहीशी नकारात्मक विचारांनी होऊ शकते. मनाविरुद्ध गोष्टी घडल्याने निराशा येईल. व्यवसाय सुरळीत चालेल, मात्र अपेक्षित आर्थिक लाभ मिळण्यात अडथळे येतील. आजच्या दिवशी निळ्या रंगाच्या वस्तूंचे दान करणे तुमच्यासाठी शुभ ठरेल.
Daily Horoscope Today: सिंह ते वृश्चिक राशीचे भविष्य
- सिंह रास (Leo):सिंह राशीच्या व्यक्तींनी आज आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. जुन्या आठवणी ताज्या झाल्याने मन काहीसे उदास किंवा नाराज होऊ शकते. नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस मध्यम स्वरूपाचा असेल.
- कन्या रास (Virgo):कन्या राशीसाठी आजचा दिवस अत्यंत सतर्कतेचा आहे. गुप्त शत्रूंपासून सावध राहा आणि आपल्या कामाशी पूर्णपणे प्रामाणिक राहा. कामात अजिबात दिरंगाई करू नका. तुमचे प्रेम जीवन (Love Life) आज सामान्य राहील.
- तूळ रास (Libra):तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. आरोग्याची किरकोळ काळजी घेणे आवश्यक आहे. व्यवसायात उत्तम यश मिळण्याचे योग असून नवीन ऑर्डर्स मिळाल्यामुळे मन प्रसन्न राहील. केलेल्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल.
- वृश्चिक रास (Scorpio):वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस शुभ आणि आनंददायी असेल. घरगुती कामांत व्यस्त राहाल आणि घरातील वातावरण उत्साही असेल. भविष्याबद्दल वाटणारी भीती किंवा नकारात्मक विचार दूर करण्यासाठी योग अन् ध्यानाचा (Meditation) आधार घ्या.
Daily Horoscope Today: धनु ते मीन राशीचे भविष्य
- धनु रास (Sagittarius):धनु राशीच्या लोकांसाठी दिवस सामान्य राहील. नाक, कान आणि घशाशी संबंधित किरकोळ आरोग्य तक्रारी जाणवू शकतात. मुलांकडून शुभ बातमी मिळण्याची शक्यता आहे. देवी लक्ष्मीच्या कृपेने आर्थिक स्थिती भक्कम राहील. कामाच्या निमित्ताने प्रवास करावा लागेल.
- मकर रास (Capricorn):मकर राशीच्या जातकांसाठी आज धनहानीचे (आर्थिक नुकसानीचे) संकेत आहेत. त्यामुळे आज कोणताही मोठा पैशांचा व्यवहार करणे टाळा. नवीन गुंतवणुकीसाठी आजचा दिवस अजिबात योग्य नाही. ग्रहांची प्रतिकूल स्थिती लक्षात घेऊन काळजीपूर्वक निर्णय घ्या.
- कुंभ रास (Aquarius):कुंभ राशीसाठी दिवस चांगला असला तरी आज कोणतीही नवीन किंवा महत्त्वाची कामे हाती घेणे टाळावे. आरोग्याबाबत थोडी तडजोड करावी लागू शकते. व्यवसायाचा विस्तार होईल, मात्र तात्काळ मोठा नफा मिळणार नाही. शुभ परिणामांसाठी हिरव्या वस्तूंचे दान करा.
- मीन रास (Pisces):मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अत्यंत फलदायी आणि शुभ ठरेल. दीर्घकाळापासून रखडलेली महत्त्वाची कामे यशस्वीपणे पूर्ण होतील. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल आणि हाती घेतलेल्या कार्यात यश प्राप्त होईल. लवकरच प्रवासाचे योग जुळून येतील.
(टीप : वरील सर्व बाबी रत्नागिरी खबरदार केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून रत्नागिरी खबरदार कोणताही दावा करत नाही.)
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:59 19-08-2026














