नवी मुंबई ‘मेडिसिटी’ करारप्रसंगी सर्जिओ गोर यांची दाद; आंतरराष्ट्रीय पातळीवर मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वाची चर्चा
मुंबई:
Devendra Fadnavis Sergio Gor (देवेंद्र फडणवीस व सर्जिओ गोर): “आजघडीला महाराष्ट्र हा दोन गोष्टींमुळे जगाच्या नकाशावर आहे. एक म्हणजे मुंबई आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या राज्याचे अद्वितीय व विलक्षण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,” अशा अत्यंत गौरवशाली शब्दांत अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जिओ गोर (Sergio Gor) यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जाहीर कौतुक केले आहे.
नवी मुंबई ‘मेडिसिटी’साठी क्लिव्हलँड क्लिनिकसोबत ऐतिहासिक करार
ANI च्या वृत्तानुसार, मुंबईतील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ‘मेडिसिटी’ प्रकल्पासाठी अमेरिकेच्या प्रसिद्ध ‘क्लिव्हलँड क्लिनिक’सोबत महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) संपन्न झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांच्या विशेष उपस्थितीत हा करार स्वाक्षरीत करण्यात आला.
या कार्यक्रमानंतर इंडो-अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स (IACC) च्या व्यासपीठावरून बोलताना राजदूत सर्जिओ गोर यांनी भारत-अमेरिका द्विपक्षीय सहकार्य, व्यापार आणि आरोग्य क्षेत्रातील गुंतवणुकीवर भाष्य केले.
Devendra Fadnavis Sergio Gor: व्यासपीठावरून अमेरिकन राजदूतांचे कौतुकोद्गार
आपल्या भाषणात मुख्यमंत्र्यांचे कौतुक करताना अमेरिकन राजदूत सर्जिओ गोर म्हणाले:
- डायनॅमिक नेतृत्व: “मी जगभरात फिरलो आहे, अनेक जागतिक नेत्यांना भेटलो आहे. पण तुमच्याकडे देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा एक अत्यंत डायनॅमिक, प्रचंड ऊर्जा असलेला आणि आपल्या कामाबद्दल मनापासून आस्था असणारा नेता आहे.”
- जगाच्या नकाशावर स्थान: “महाराष्ट्र दोन मुख्य कारणांमुळे जगात ओळखला जातो—एक म्हणजे मुंबई आणि दुसरे म्हणजे तुमचे विलक्षण मुख्यमंत्री!”
एखाद्या अनिवासी भारतीय किंवा परदेशी उद्योजकाऐवजी थेट अमेरिकेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राजदूताने (Ambassador) राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे असे खुलेपणाने कौतुक करणे ही राजकीय व राजनैतिक वर्तुळात मोठी उल्लेखनीय बाब मानली जात आहे.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय राजकारणात राजकीय चर्चांना उधाण
गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राष्ट्रीय स्तरावरील कार्यपद्धतीची चर्चा रंगली आहे. नुकतीच त्यांनी नवी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या पार्श्वभूमीवर, अमेरिकन राजदूतांनी आंतरराष्ट्रीय मंचावरून केलेले हे कौतुक फडणवीस यांच्या प्रशासकीय व विकासकामांच्या पावती मानले जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:38 19-08-2026














