Maharashtra Special Intensive Revision Electoral Roll: महाराष्ट्रात एसआयआरचा पहिला टप्पा पूर्ण; २ कोटी मतदारांची गणनापत्रे अनकलेक्टेड, १७.६३ लाख दुबार मतदार

घरोघरी मोहिमेदरम्यान ७.७१ कोटी मतदारांची पडताळणी; मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या संकेतस्थळावर मतदार याद्या लवकरच प्रसिद्ध होणार


मुंबई:

Maharashtra Special Intensive Revision Electoral Roll (महाराष्ट्रातील विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम): राज्यात राबवण्यात आलेल्या विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) कार्यक्रमांतर्गत घरोघरी जाऊन गणना प्रपत्र भरून घेण्याचा पहिला टप्पा ३० जून २०२६ ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत यशस्वीरीत्या पार पडला आहे. या मोहिमेत राज्यातील एकूण ९.७८ कोटी मतदारांपैकी ७.७१ कोटी (७८.८५ टक्के) मतदारांचे गणनापत्र प्राप्त झाले असून, तब्बल २.०७ कोटी (२१.१५ टक्के) मतदारांची गणनापत्रे जमा झाली नसल्याने त्यांना ‘Uncollectable EF’ गटात समाविष्ट करण्यात आले आहे.

मतदार याद्यांशी संबंधित प्रक्रिया, दावे-हरकती आणि पुढील घोषणांबाबतच्या माहितीसाठी नागरिक आणि मतदारांनी भारत निवडणूक आयोग (ECI) किंवा मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र (CEO Maharashtra) यांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

गणनापत्रे प्राप्त न होण्याची प्रमुख कारणे
प्रत्यक्ष वस्तुस्थितीनुसार व नियमांनुसार प्रारुप मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यास अपात्र ठरलेल्या मतदारांची वर्गवारी खालीलप्रमाणे आहे:

आढळून न आलेले / गैरहजर (Absent): ७५.५२ लाख

कायमस्वरूपी स्थलांतरित (Permanently Shifted): ७६.८० लाख

मृत मतदार: ३४.८१ लाख

दुबार मतदार: १७.६३ लाख

इतर कारणे: २.२३ लाख

Maharashtra Special Intensive Revision Electoral Roll: प्रारुप याद्या लवकरच प्रसिद्ध होणार
विशेष सखोल पुनरीक्षणांतर्गत तयार करण्यात आलेल्या प्रारुप मतदार याद्या लवकरच अधिकृतपणे प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. या याद्या मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना सॉफ्ट व हार्ड कॉपीच्या स्वरूपात उपलब्ध करून दिल्या जातील. तसेच ज्यांची नावे समाविष्ट करता आलेली नाहीत, अशा ‘Uncollected EF’ गटातील याद्या जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयांच्या सूचना फलकावर आणि अधिकृत पोर्टल्सवर प्रसिद्ध केल्या जातील.

दावे, हरकती आणि अंतिम मतदार यादीबाबतची प्रक्रिया
प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर पुढील एका महिन्याच्या कालावधीत नागरिकांना दावे आणि हरकती दाखल करण्याची संधी दिली जाईल:

नवीन मतदार नोंदणी: प्रारुप यादीत नाव नसलेले नागरिक किंवा १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकापूर्वी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नव मतदारांना नाव समाविष्ट करण्यासाठी नोंदणी अर्जाची सुविधा उपलब्ध राहील.

अर्जांची पडताळणी: मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडून प्राप्त अर्जांची पडताळणी केली जाईल आणि पात्र मतदारांचा समावेश केला जाईल.

पुढील नियोजन: या प्रक्रियेनंतर अंतिम मतदार यादी निवडणूक आयोगाकडून २७ ऑक्टोबर २०२६ रोजी जाहीर केली जाणार आहे.

नागरिक त्यांच्या नोंदणी स्थितीची पाहणी राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल (NVSP) वर ऑनलाइन पद्धतीने करू शकतात.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:47 19-08-2026