उन्हाळ्यात महावितरणने केलेल्या अतिरिक्त वीज खरेदीचा खर्च भरून काढण्यासाठी महावितरणचा निर्णय; वीज नियामक आयोगाच्या निर्देशानुसार आकारणी
रत्नागिरी:
Fuel Adjustment Charges Electricity Bill Hike (इंधन समायोजन शुल्कामुळे वीज बिलात वाढ): उन्हाळ्यात वाढीव वीजबिलांनंतर पावसाळ्यात वीज वापर कमी झाल्याने दिलासा मिळेल अशी अपेक्षा असलेल्या वीजग्राहकांना आता पुन्हा एकदा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. जुलै महिन्यातील वीज वापरासाठी महावितरणकडून इंधन समायोजन शुल्क (Fuel Adjustment Charge – FAC) लागू करण्यात आले असून, त्यामुळे ऑगस्टमध्ये येणाऱ्या वीजबिलात अतिरिक्त रक्कम आकारली जाणार आहे.
महागड्या दराने वीज खरेदीचा खर्च वसूल करणार
यंदाच्या उन्हाळ्यात राज्यात विजेची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली होती. ही वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी महावितरणला काही प्रमाणात महागड्या दराने वीज खरेदी करावी लागली. हा अतिरिक्त खर्च भरून काढण्यासाठी महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या (MERC) निर्देशानुसार इंधन समायोजन शुल्क आकारण्यात येत असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
Fuel Adjustment Charges Electricity Bill Hike: वापर श्रेणीनुसार अतिरिक्त दरांचा तक्ता
घरगुती ग्राहकांच्या वीज वापराच्या श्रेणीनुसार तसेच व्यावसायिक व औद्योगिक वापरासाठी हे शुल्क वेगवेगळे असणार आहे:
| ग्राहक वर्गवारी | वीज वापर श्रेणी / प्रकार | अतिरिक्त इंधन समायोजन शुल्क (प्रति युनिट) |
| घरगुती ग्राहक | दारिद्र्यरेषेखालील (BPL) | १० पैसे |
| ० ते १०० युनिट्स | २० पैसे | |
| १०१ ते ३०० युनिट्स | ४० पैसे | |
| ३०१ ते ५०० युनिट्स | ५० पैसे | |
| ५०० युनिट्सपेक्षा अधिक | ६० पैसे | |
| व्यावसायिक ग्राहक | कमी दाब (LT) व्यावसायिक | ४० ते ६० पैसे |
| औद्योगिक ग्राहक | कमी दाब औद्योगिक | २५ ते ३५ पैसे |
| उच्च दाब औद्योगिक | ३० ते ४५ पैसे | |
| इलेक्ट्रिक वाहने (EV) | ई-व्हीईकल चार्जिंग स्टेशन | ३० पैसे |
ई-व्हीईकल चार्जिंग आणि व्यावसायिक वापरालाही फटका
इंधन समायोजन शुल्काचा परिणाम केवळ घरगुती ग्राहकांपुरता मर्यादित राहणार नाही. दुकाने, कार्यालये, कारखाने आणि इतर व्यावसायिक आस्थापनांच्या वीजबिलातही वाढ होणार आहे.
तसेच, इलेक्ट्रिक वाहनांचा (EV) वापर करणाऱ्या ग्राहकांना आणि ई-व्हीईकल चार्जिंग स्टेशन चालकांना प्रति युनिट ३० पैसे अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार असल्याने आता वाहने चार्ज करण्यासाठीही पूर्वीपेक्षा अधिक खर्च करावा लागणार आहे. एप्रिलमध्ये वीजदरात दिलासा मिळाल्याचे सांगण्यात आले होते, मात्र आता या समायोजन शुल्कामुळे प्रत्यक्षात वीजबिलाची रक्कम वाढून ग्राहकांचे बजेट कोलमडणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:08 19-08-2026














